वंचित बहुजन आघाडी सर्व वंचित घटकांचा पक्ष – भूषण फुसे
वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा च्या वतीने बैलमपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न
राजुरा, 4 एप्रिल : वंचित बहुजन आघाडी हा कोण्या एका समाजाची मक्तेदारी किंवा कोण्या एका विशिष्ट समूहाचा पक्ष नव्हे तर सर्व घटकांना सत्ते मध्ये सहभागी करणारा पक्ष आहे असे मत जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले. वंचित ची भूमिका व वंचित खेड्यापाड्यात घरोघरी मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेलेल्या सामान्य वंचित घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असे मत त्यांनी भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना कार्यकर्त्यांना सांगितले.
शाखा मनोली आणि शाखा बैलमपूर येथे फलक उदघाटन करून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्य कुशल मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, अमोल राऊत, रमेश लिंगमपल्लीवार, मधू चुनारकर, भगीरथ वाकडे, रवी बावणे, सुशील मडावी, सुभाष रामटेके, बालाजी सोनकांबळे, विजय जुलमे, किशोर रायपुरे, विजय जीवने आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी लढवेल हा संकल्प यावेळी करण्यात आला. यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वतःला झोकून देऊन कार्याला गती द्यावी असे मत व्यासपीठावर उपस्थितांनी व्यक्त केले. काल बैलमपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वीततेकरिता ग्राम शाखा पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.