पर्यावरण संतुलन व ग्रामीण आर्थीक समुद्घीसाठी नदीकाठी पडजमिनीवर बांबु लागवड उपक्रम राबवा – आबिद अली

0
758

पर्यावरण संतुलन व ग्रामीण आर्थीक समुद्घीसाठी नदीकाठी पडजमिनीवर बांबु लागवड उपक्रम राबवा – आबिद अली

 

कोरपना/प्रतिनिधि : चंद्रपूर जिल्ह्यात झालेली औद्योगिक क्रांती वाढते तापमान धूळ प्रदूषण पर्यावरण संतुलना मध्ये झालेला बिघाड वन वृक्षांची होत असलेली ऱ्हास बारमाही वाहणाऱ्या नदीवर झालेला परिणाम पाणी टंचाई ही परिस्थिती प्रदूषणाचा आरोग्य व शेती उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे डबघाईस आलेली आर्थिक स्थिती नागरिकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणामांमुळे एकेकाळी वन वैभवाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्हा वाळवंट होण्याकडे वाटचाल करत आहे. वातावरणात झालेला बदल याचे चटके देखील नागरिकांना दिसून येत आहे उद्योगांमध्ये क्रांती करून या जिल्ह्यात एन टी पी एस सिमेंट उद्योग पेपर मिल तसेच लहान वीज निर्मिती प्रकल्प शेकडो कोळसा खाणी यामधून होणारे धूळ प्रदूषण कार्बन ऑक्साईड हवेत सोडत असल्याने प्रदूषण वाढ झाल्याने शेतीच्या उत्पादनावर घट पिकावर झालेले परिणाम मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर विविध आजाराचे दुष्परिणाम संभाव्य धोका लक्षात घेता “नदी झांकी तो जल राखी” हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योगामुळे सातत्याने होणारे पाणी उपसा ओसाड पडत असलेल्या नद्या दूषित पाण्यामुळे मानव व प्राण्यावर होत असलेले परिणाम देशपातळीवर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी चळवळ उभी करून ग्रामीण अर्थकारणाला बळकटीकरणासाठी सातत्याने जागर करीत आहे.

बांबू लागवडीसाठी केंद्र व राज्य शासनाने नॅशनल बांबू मिशन अटल बांबू योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. बांबू पासून इथेनॉल कपडे आवश्यक गरजू साहित्य फर्निचर असे अठराशे प्रकारचे उत्पादन होत असल्याने शेतकरी बांबू लागवडीसाठी पुढे सरसावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदी इरई पैनगंगा अंधारी वैनगंगा बेंबळा यासह अनेक उपनद्या वाहतात या नदीच्या पंचक्रोशीत अनेक उद्योग उभे आहेत. एकीकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या औस पडत असून पाण्याचा उपसा मुळे नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहावर परिणाम झाल्याने दुष्काळाची सुद्धा परिस्थिती या जिल्ह्यात दिसते. तीव्र दुष्काळाचा सामना करणारा मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात नदी पुनर्जीवित करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त लातूर जालना नांदेड उस्मानाबाद बीड या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी चळवळ उभी करून बांबू नदीकाठावर लागवडीची मोहीम सुरू केली आहे. त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सी एस आर सामाजिक दायित्व निधी अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्युत प्रकल्प सिमेंट उद्योग पेपर मिल वेस्टर्न कोलफिल्ड तसेच कोल वाशरीज यांच्या मार्फतीने नदीकाठावर बांबू लागवडीचा उपक्रम राबविण्यात यावा. यामुळे प्रदूषणावर आळा व पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यास उपयुक्त ठरणार आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here