चेक आष्टा येथील ग्रामपंचायतने केलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करा.

0
812

 

चेक आष्टा येथील ग्रामपंचायतने केलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करा.

पत्रकार परिषदेत गावकऱ्यांची मागणी

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या चेक आष्टा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदभरती, वन समिती निवडीमध्ये आपल्या मनमर्जीने ग्रामसभेची कोणतीही परवानगी नसतांना शिपाई पदभरती व वन समिती अध्यक्षाची निवड केली, हि बोगस असून यावर कारवाई करण्याची मागणी जयंत पिंपळशेडे, सदस्य, गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.

ग्राम पंचायत चेक आष्टा येथे पदभरती संदर्भात जाहिरात काढुन फॉर्म २० / १० / २०२१ पर्यंत फॉर्म मागवण्यात आले. त्यानंतर पात्र अपात्र यादी प्रसिद्ध न करता ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच यांनी सचिवाला विचारात न घेता नविन जाहिरात दिनांक २८/०१/२०२२ ला लावण्यात आली. सर्व जुने फॉर्म भरलेले विद्यार्थी नविन जाहिरात संदर्भात द्विधा मनस्थितीत आहे. नविन जाहिरात सरंपच यांच्या सहिने आहे. त्या जाहिरात वर शासकीय कर्मचारी यांची सही सुद्धा नाही.

तसेच ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही ग्रामसभा व मासिक सभेमध्ये विषय न ठेवता परस्पर लिहुन वनसमिती गठीत करून बोगस ठराव केला. याबाबतची माहिती गावात कोणत्याही नागरीकांना देण्यात आली नाही. तसेच मुनादी हि देण्यात आली नाही. आणि वन समिती निवड आपल्या मनमर्जीने करण्यात आली. याबाबत ग्रामसेवकाला माहीती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिले. या प्रकरणात गावकऱ्यांची व विद्यार्थ्यांची फसवणुक झाली. त्यामुळे चेक आष्टाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन पिडीत विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य जयंत पिंपळशेंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

या प्रकरणी चौकशी करून न्याय न दिल्यास विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना धरुन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.पत्रकार परिषदेला सुरेश मडावी, अविनाश बोडेकार, जिवनदास कुंभरे, समिर वांढरे, राकेश वाढरे, चंद्रशेखर ताजणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here