भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू;गाव हळहळला
मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा;अन्यथा आंदोलन: गावकऱ्यांची भूमिका
गोंडपिपरी- भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ता माजी ग्राम पंचायत सदस्य यांचा दि.२ बुधवारी रात्री ८ च्या सुमारास अपघात झाला त्यात ते जबर जखमी झाले.उपचारादरम्यान निधन झाले.
तळोधी येथील संतोष ताजने हे आपल्या दुचाकीने विलास कत्रोजवार साहकाऱ्यासोबत गोंडपीपरिवरून तळोधी जात होते .चेकविठलवाड्याजवळ काम सुरू असल्याची माहिती नसल्याने अंदाज न आल्याने गाडी घसरून पडली त्यात संतोष ताजने जखमी झाले होते.लगेच त्यांना उपचारासाठी चंद्रपूर हलवण्यात आले.दि.३ गुरुवारी सेवाग्राम नेताना दुपारी ४ च्या दरम्यान प्राण ज्योत मावळली. विठलवाडा ते पोडसा रस्त्याचे काम सुरू असून त्याठिकाणी कसलेही दिशा दर्शक फलक सूचना फलक न लावल्याने अपघात झाला असा आरोप करत गावकऱ्यांनी तळोधी येथे सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली. d.c.g कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे हा मृत्यू झाला असून कुटूंबाला आर्थिक मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.संतोष ताजने याच्या पच्यात मुलगा,मुलगी,पत्नी असून गावात शोककळा व्यक्त केल्या जात आहे.आज तळोधी येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांनी भेट दिली यावेळी गावकऱ्यांनी d.c.g कंपनीने ताजने कुटुंबियांना मदत करावे अन्यथा गावकरी व शिवसेना उद्या रस्त्यावर उतनार असा ईशारा शिवसेना नेते संदिप करपे यांनी दिला.