पाहर्णी येथे वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता मेळावा संपन्न…
नागभीड/प्रतिनिधी, 2 मार्च : काल चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील पाहर्णी येथे महाशिवरात्री निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शाखा पाहर्णी च्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार गजभे, प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे मुख्य समन्वयक अरविंद सांदेकर, चंद्रपूर जिल्हा सचिव स्नेहदीप खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा सल्लागार डॉ. प्रेमलाल मेश्राम, चंद्रपूर जिल्हा सचिव महिला आघाडी कल्पना खरात, नागभीड तालुका अध्यक्ष खेमदेव गेडाम, चिमूर तालुका उपाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर नागदेवते, कांपा पंचायत समिती क्षेत्र प्रमुख धर्मवीर गराडकर, मनीषा उमक, कविता जांभुळे,पद्मिनी धनविजय, काशिनाथ शामकूळे आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्ताने मागदेव शंकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. तद्नंतर आदिवासी नेते स्व. नारायणसिंह उईके यांच्या पुतळ्याला नमन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे पक्षप्रवेश सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यात सर्वश्री मालोजी रामटेके, नारायन नान्हे, आशिष शेंडे, प्रवीण पात्रे, अनिल बेदरे, संजय निरगुडे आदिंचा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीत झाला.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन कु. पायल रामटेके प्रास्ताविक खेमदेव गेडाम तर आभार सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नागभीड तालुका अध्यक्ष अभिषेक रामटेके यांनी मानले.
या मेळाव्याच्या आयोजना करिता मालोजी रामटेके यांचे खूप मोठे सहकार्य लाभले. मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता अभिषेक रामटेके तसेच वंचित बहुजन आघाडी शाखा पाहर्णी चे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी आदिंनी अथक परिश्रम घेतले. यावेळी गावकरी पुरूष, महिला, मुले, मुली कार्यकर्ते उपस्थित होते.