विविध स्पर्धांनी संपन्न झाली नांदा येथील शिवजयंती

0
1019

विविध स्पर्धांनी संपन्न झाली नांदा येथील शिवजयंती

गडचांदूर :विविध स्पर्धा ढोल-ताशाचा गजर अंगणा अंगणा मध्ये छत्रपती विषयक रांगोळ्या छत्रपतींच्या विविधांगी वेशभूषा छत्रपतींचा जयघोष आणि दिल्ली स्पर्धा युक्त दिंडी अशा विविध प्रेमाने नांदा येथील तुकडोजी महाराज चौकामध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटात मध्ये संपन्न झाली. रात्र कालीन कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील शाळांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पथनाट्य आणि सामूहिक नृत्य आणि गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त गावच्या पोलीस पाटील वैशालीताई भोयर उपस्थित होत्या. त्यांनी चक्क आपल्या लहानग्या बाळाला शिवाजीचा वेश धारण करून मंचावर उपस्थित झाल्या. व आपल्या मार्गदर्शनातून शिवाजी महाराज हे शेजार्‍याच्या घरी नाहीतर आपल्याच घरी जन्मास यावा. राज्यामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि कमी याचा आम जनतेवर होणारा परिणाम याचा सर्वस्वी लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील प्लास्टिक सर्जन डॉक्टर रुपेश ठाकरे उपस्थित होते. आपल्या दीर्घकालीन मार्गदर्शनातून आजच्या समाजाची गत आणि असलेली शिवाजी महाराजांची अत्याधिक आवश्यकता आहे असे विचार समाजातील अनिष्ट रूढी प्रथा चालीरीती परंपरा याच्यावरती प्रखर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून नांदा बाखर्डी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शिवचंद्र काळे, कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजय मुसळे,जेष्ठ नागरिक शामसुंदर राऊत, प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे, उत्कृष्ट शेतकरी अंकुश धाबेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास पानघाटे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड, ग्रामपंचायत सदस्य अभय मोनोत, मुरलीधर बोडके व विशेष अतिथी म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, रामकृष्ण रोगे, गोविंद गुप्ता प्रमोद वाघाडे, प्रकाश बोरकर, अध्यक्ष हेमंत वाटेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदित्य बोडके व सानिया शेख यांनी आपल्या विशिष्ट शैलीत केले. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग छटा सादर करण्यात आल्या गावातून ढोल-ताशांच्या गजरामध्ये आली. महिलांसाठी समय व रांगोळी स्पर्धेचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण गाव रंगीत रांगोळ्यांनी सजलेला दिसून येत होता. विद्यार्थ्यांची सामूहिक नृत्य, सामूहिक गीत स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा मानपत्र देऊन मंडळाच्यावतीने करण्यात आले. आभार संकेत खोके यांनी मानले शिवजयंती उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवजयंती उत्सव समितीचे संपूर्ण पदाधिकारी व सदस्य गावातील तरुण मित्र परिवार त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here