केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सह औरंगाबादकरांना, मराठवाड्याला रेल्वे मंत्रालयाने दाखवला लाल झेंडा….
(ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर)
केंद्रीय अर्थ संकल्प नुकताच जाहीर झाला, पूर्वी रेल्वेचे बजेट वेगळे असायचे. आता एकत्र बजेट सादर होते. औरंगाबाद रेल्वे स्थानकाला या वर्षी हास्यास्पद तरदुत केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये रेल्वे मंत्रालयाने केली आहे, ती आहे फक्त “एक हजार रुपये.” कुणी लाखभर रुपये देता का अशी म्हणण्याची वेळ औरंगाबादकर यांनाआली आहे.
औरंगाबाद रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या स्थानकाला वेरूळ, अजिंठा या पर्यटन स्थळांच्या अस्तित्वाने अन्यन साधारण महत्व आहे. हे रेल्वे स्थानक मॉडर्न करावे अशी अनेक दिवसांची मागणी औरंगाबादकर कायम करत आले. २०१५ साली याची घोषणा झाली.पण कोणतीही कामाची सुरवात प्रत्यक्षात झाली नाही, की ना निधीची तरतूद . पर्यटनाचे माहेर घर असलेल्या या रेल्वे स्थानक ला आधुनिक करण्यात कोणतीच तरतूद आता पर्यंत झाली नाही,असे प्रवासी संघटनेचे म्हणने आहे. या वर्षी तरतूद झाली , किती तरतूद झाली याचा मागोवा घेतला तर ती मराठवाड्याची चेष्टा होईल. केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये फक्त ₹ १०००/ तरतुद करून खुद्द रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचीच तसेच औरंगाबाद काय तर पूर्ण मराठवाड्याची चेष्टा केली आहे . जनतेत या बाबत तीव्र संताप आहे.