चक्क गांधी पुण्यतिथीच्या दिवशीच गोंडपिपरी तालुक्यातील बारमधून दारुविक्री
गोंडपिपरी/प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांची मोलाची भूमिका राहिली, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारीला पुण्यतिथी होती. या दिवशी गोंडपिपरी चे तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांचे सुपुत्र शुभम मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह देशभरात दुखवटा असतांना या दिवशी बियर बार मधून अवैद्य दारूविक्री सुरू ठेवल्याचा आरोप गोंडपिपरी तालुका शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.
महात्मा गांधी पुण्यतिथी च्या दिवशी राज्यात दारू विक्रीला बंदी असते. या बंदीतही शुभम मेश्राम यांनी दारू विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप शिवसेनेचे जयेश कार्पेनवार व सामाजिक कार्यकर्ता संजय पुढ्टवार यांनी केला. खरेदी-विक्री दरम्यान गोंडपिपरी येथील संजय पुढ्टवार भंगाराम तळोधी ग्रामपंचायत सदस्य जयेश कारपेनवार यांनी हा प्रसंग अनुभवला. शुभम मेश्राम यांचे वडील गोंडपिपरी चे तालुका दंडाधिकारी म्हणून कार्यरत असून तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासह अवैध धंद्यावर आळा घालण्याचे काम त्यांच्याकडून होण्याची अपेक्षा आहे. अशावेळी ते या बेकायदेशीर कामात कामाला सहकार्य करीत पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. मौजा तारसा गावात रीगल बार म्हणून कार्यान्वित असून बंदी च्या दिवशी आणि त्यातच गांधी पुण्यतिथी असताना तिथून अवैद्य दारूविक्री होताना आढळून आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदारांनी मेश्राम यांच्या सुपुत्रा वर दुजाभाव न करता कार्यवाही करण्याची मागणी गोंडपिपरी तालुका शिवसेनेचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सदस्य जयेश कार्पेनवार यांनी सादर केलेल्या प्रेस नोट च्या माध्यमातून केली आहे.