सांगोडा येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत
विकास अवताडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी अनिल मोहितकर यांची निवड
बिबी: कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगोडा येथील मागिल शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नुकतीच नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून विकास अवताडे यांची उपस्थित पालक वर्गातून बहुमताने निवड करण्यात आली. शाळेचा मुख्याध्यापिका शोभा शेंडे यांनी आयोजित शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याकरिता सर्व पालक वर्गांना प्राचारान करून आवाळपुर बिटाचे केंद्रप्रमुख पंढरीजी मुसळे यांच्या मार्गदर्शनात पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बहुमताने अध्यक्ष म्हणून विकास अवताडे तर उपाध्यक्ष म्हणून अनिल मोहितकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सांगोडा गावाच्या सरपंचा संजना सचिन बोंडे, केंद्रप्रमुख पंढरीजी मुसळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय कोल्हे, माजी शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष प्रवीण घोगरे, रामचंद्र हनुमंते, शाळेचा मुख्याध्यापिका शोभा शेंडे, शिक्षक रमेश पडवेकर रमेश टेकाम, राजेश धांडे, व अंगनवाड़ी सेविका पुष्पा वरपटकर यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगोडा चा वतीने सर्व नवनिर्वाचित समिती सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.