आपली सुरक्षा आपल्या हाती ‘मास्क घाला-कोरोना टाळा’
राजुरा : कोरोना विषाणूचा (कोव्हीड – १९) चा प्रादुर्भाव रोखन्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राजुरा शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, ठोक व किरकोळ विक्रेता, दुकनदार इतर यांना शहरात फिरत असताना मास्क लावण्याबाबत निर्देश व विनंती करण्यात आली होती. परंतु सगळ्यांना सूचना व आव्हान केल्यानंतरही शहरातील बरेच नागरीक यांनी नियमाचे पालन न केल्यामुळे काल १७ तारखेला नगर परिषद राजुरा व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये प्रमाणे १३ नागरिकांवर कार्यवाही करून २६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
सदर कार्यवाही मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर आणि पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात प्रामुख्याने नगर परिषद चौक, पंचायत समिती चौक, नाका न. 3, गांधी चौक येथे नगर परिषद अधिकारी व पोलीस विभाग मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही यशस्वी करण्याकरिता विजय जांभूळकर, अभिनंदन काळे, आदित्य खापणे, उपेंद्र धामंगे, संकेत नंदवंशी, सतिश देशमुख, शौकत कुरेशी, रमेश बावणे, ओमप्रकाश गुंडावर, जयप्रकाश पांडे, रोशन ढोके, संजय जोशी, अनुप करमरकर, हरिश पाटील, हंसराज बच्चाशंकर, बाबुराव गोगलवार, राजु कवठे, विनोद आरमुलवार, नुसरत अली, दिलीप नंदीमगवार, राजु लांडगे व इतर कर्मचारी यांनी सदर मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
यावेळी मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांनी नागरिकांना विनंती व आव्हान केले की यापुढेही दिवसेदिवस ही कार्यवाही कडक होणार आहे. तरी नागरिकांनी आदेशाचे पालन करावे आणि सर्वानी प्रशासनास सहकार्य करावे.