सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात कोविड लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
650

सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात कोविड लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
गडचांदुर – येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात वयोगट पंधरा ते अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 17 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. काळे आणि कोरपना राजुरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंबे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 जानेवारी ला या कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराला सुरुवात झाली. या लसीकरण शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महाविद्यालयातील एकूण 600 विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून सुरु करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आज 17 जानेवारीला जवळपास 200 विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग दर्शविला.

या प्रसंगी कला विभाग प्रमुख म्हणून प्रा जहीर सैय्यद तसेच प्रा मेहरकूरे प्रा. झाडे प्रा मुप्पीडवार प्रा डफाडे प्रा भगत प्रा सुरपाम, शिक्षकेत्तर कर्मचारी गणपत आत्राम, प्रेमचंद आदोळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी गडचांदूर येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक पवन ताजणे व कु. ज्योत्स्ना ताजणे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here