राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय गडचांदूर इथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
कोरपना प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तथा पूजन करून झाली.
या प्रसंगी प्रविण काकडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापन करून रयतेला मोठा आधार दिला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. स्वराज्य हे आमच नसून इथल्या सर्वसामान्य
रयतेच स्वराज. स्वराज्यातिल रयत सुखी होती, शेतकऱ्यांच, कष्टकऱ्यांच राज्य होत. जिजाऊंनी या देशाला २ छत्रपती दिले. अनेक शाह्याना उध्वस्त करण्यास जिजाऊ समर्थ ठरल्या. अश्या शूरवीर मातेचा १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे म्हाळसाराणी व लखोजीराजे जाधव यांच्या पोटी जन्म झाला. आज सिंदखेडराजा मातृतीर्थ म्हणून ओळखल्या जात. लाखोंच्या संख्येने लोक दरवर्षी राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यास जातात.
या प्रसंगी शरदभाऊ जोगी उपनगराध्यक्ष न.प गडचांदूर, सुनिल अरकीलवार, प्रविण मेश्राम, करण सिंग भुरानी, सूरज जुनघरे, मयूर गारगिलवार, प्रविण हरणे आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.