पायी देशाटन करणा-या रोहन अग्रवाल यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांची भेट
जनजागृतीपर उपक्रमा बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी रोहनला संविधान पुस्तीका भेट देत केले स्वागत
प्लास्टिक बाबत जनजागृती करत देशाची संस्कृती, सभ्यता समजून घेण्यासाठी पायी देशाटन करण्यासाठी निघालेल्या नागपूर येथील रोहन अग्रवाल यांनी चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी रोहनच्या या अभिनव धाडसी उपक्रमा बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी रोहनला संविधानाचे पुस्तक भेट देत त्याचे स्वागत केले.
प्लास्टिकमुळे देशातील प्रदुषनात प्रचंड वाढ होत आहे. तसेच प्लास्टिक ही न कुजनारी वस्तू असल्याने तिला नष्ट करणेही अश्यक्य आहे. प्लाॅस्टिक खाल्याने अनेक मुक्या प्राण्यांचा जिव गेल्याच्या घटना समोर आल्या आहे. असे असतांनाहि प्लाॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. त्यामुळे प्लाॅस्टिक बाबत जनजागृती करणे, विविधतेत एकता प्रस्थापीत करणे, आणि भारतीय संस्कृती, सभ्यता समजून घेण्यासाठी नागपूर येथील रोहन अग्रवाल हा १९ वर्षीय उत्साही तरुण देशात पायदळ यात्रा करत आहे. यात्रेदरम्यान तो चंद्रपूरात पोहचला असता त्याने आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यालयात येऊन भेट घेतली यावेळी त्याने त्याच्या या पायदळ देश भ्रमंतीच्या उद्देशाबाबत आ. जोरगेवार यांना माहिती दिली. आ. जोरगेवार यांनी रोहनच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांला शुभेच्छा दिल्यात तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी रोहनला भारतीय संविधानाचे पुस्तक भेट स्वरुप देत त्याचे स्वागत केले. या प्रंसगी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन यांची उपस्थिती होती.