इंदिरानगर हनुमान टेकडी परिसरातील मंजूर कामे तत्काळ सुरु करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना निवेदन
इंदिरा नगर येथील हनुमान टेकडी परिसरात नागरिकांच्या मागणी नंतर अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. मात्र अद्यापही सदर कामांना सुरवात झालेली नाही. त्यामूळे मंजूर सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या इंदिरानगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नरेश मुलकावार ,तापोश डे, हेरमन जोसेफ , शकील शेख ,बंडू पटले, नितेश गवळे, फुलचंद पाटील, सिद्धार्थ मेश्राम, गणेश किन्निकर, नितेश बोरकुटे आदिंची उपस्थिती होती.
इंदिरा नगर परिसरातील हनुमान टेकळी येथे विविध समस्या आहेत. त्यामूळे या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा अधिका-र्यांना वांरवार निवेदनही देण्यात आले आहे. याची दखल घेत मनपा उपायुक्त यांच्या मार्फतीने सदर परिसराची पाहणी करून अहवाल मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसात सदर कामे चालु करू असे मनपाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. मात्र आता 2 महिण्यांचा कालावधी लोटत असला तरी हे कामे सुरु झालेली नाही. त्यामूळे येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गांभिर्याने दखल परिसरातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना करण्यात आली आहे.