चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर
चंद्रपूर : जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती) आरक्षण व निवडणूक नियम 1962 मधील तरतुदीनुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली.
सदर सोडतीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटके जमातींसह) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुष यांना आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती : 1
अनुसूचित जाती (महिला) : 1
अनुसूचित जमाती : 1
अनुसूचित जमाती (महिला) : 1
नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटके जमातींसह) : 2
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : 2
सर्वसाधारण : 3
सर्वसाधारण (महिला) : 3
अशा प्रकारे एकूण 15 सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
ही सोडत दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडणार आहे. इच्छुक नागरिकांनी या सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.








