भंगाराम तळोधीत पार पडले रोगनिदान रक्तदान मोतीबिंदू तपासणी शिबिर
गोंडपीपरी, सुरज माडुरवार
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर आणि महाकाली अभिनव सह.संस्था, मर्या.यांचे संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान व रक्तदान आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन जि.प. उच्च प्राथ. शाळा, भं. तळोधीच्या प्रांगणात करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी प सदस्य वैष्णवी बोडलावार, सुनीता येगेवार, सरपंच लक्ष्मी बालुगवार,उपसरपंच सुरेंद्र धाबर्डे, सुनिल रामगोनवार, राजेश्वर कुकुडकर,डॉ पराग जवळे, डॉ. चेतना गौतम, डॉ. अश्विनी आखाडे, डॉ. बुऱ्हाण, डॉ. लोने, प्रसाद चव्हाण, प्रसाद शेटे उपस्थित होते.माजी जी प सदस्य अमर बोडलावार यांनी अशा शिबिराचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना निरोगी राहण्यासाठी एक खूप मोठी संधी असल्याने प्रत्येक नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावे. अशी विनंती केली.
या शिबिरात बी.पि., शुगर,तपासणी, सिकलसेल, नेत्र, मोतिबिंदू तपासणी, रक्तदान, बँक ऑफ इंडियाच्या वतीने खातेदारांसाठी असलेल्या विमा योजनेचे कक्ष असे विविध कक्ष उभारण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हत्तीरोग रुग्णांना किटचे वितरण करण्यात आले.
यात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. यात 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 69 जणांनी मोतीबिंदू तपासणी तर 138 जणांनी बी.पी. शुगर तपासणी तर 25 खातेदारांनी पंतप्रधान विमा काढला.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमर सावकार बोडलावार मित्रपरिवार,भं.तळोधी यांनी अथक परिश्रम घेतले.