अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यामध्ये काम बंद आंदोलनाला सुरुवात
कामगारांना दिलेली अपमानजनक वागणूक भोवली
अल्ट्राटेक सिमेंट कामगारांचे लाखोचे नुकसान
नांदा फाटा प्रतिनिधी, नितेश शेंडे
नांदाफाटा:कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे स्थित अल्ट्राटेक सिमेंट कारखाना आपल्या उत्पादनाकरीता प्रसिद्ध असलेल्या सिमेंट कारखाना असून याठिकाणी कंत्राटी कामगारांना मागील अनेक दिवसांपासून अपमानजनक वागणूक दिली जात आहे. याची प्रचिती काल दिनांक 10 12 2021 रोजी त्यांची सुट्टी झाली असता कंपनी व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याकडून कंत्राटी कामगाराला अगदी खालच्या स्तरावर ती शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे कामगार वर्गात एकच असंतोष निर्माण झाला. याची प्रचिती आज दुपारपासून यायला सुरुवात झाली. या घटनेचे तीव्र पडसाद म्हणजेच आज दुपारून कामगारांनी सुट्टी झाल्यानंतर काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे मागील अनेक वर्षापासून कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन कामगार विविध प्रकारचे आंदोलन करीत असताना सुद्धा कोणत्या प्रकारच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या नाही. शिवाय सपांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कंपनी व्यवस्थापनाच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला असून जोपर्यंत अर्वाच्य शिवीगाळ करणारा अधिकारी माफी मागणार नाही. शिवाय कामगारांच्या प्रलंबित मागण्या वरती सकारात्मक चर्चा होणार नाही. तोपर्यंत हा बैठा सत्याग्रह व काम बंद आंदोलन असेच सुरू राहील. असा निर्णय कंत्राटी कामगार करिता असलेल्या विजय क्रांती कामगार संघटनेच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. कंपनी व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कंत्राटी कामगार हजाराच्या संख्येमध्ये ठिय्या मांडून बसलेले आहे.