हिवाळी पावसाळ्यात अकोले संगमनेर तालुक्यातील द्राक्ष बागा उध्वस्त
“लोकनेते सीताराम गायकर पाटील व आमदार किरण लहामटे यांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी.”
अहमदनगर
संगमनेर , ७/१२/२०२१
प्रतिनिधी (ज्ञानेश्वर गायकर पाटील)
अकोले तालुक्यातील व संगमनेर तालुक्यातील प्रामुख्याने वीरगाव,हिवरगाव,डोंगरगाव,पिंपळगाव,देवठाण,गणोरे , सुगाव , जवळे कडलग भागातील द्राक्षबागायतदारांचे काही करोडोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून , या भगातील द्राक्ष बागायतदार यांच्या “वावरात” जाऊन काल अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व लोकनेते सीताराम गायकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.त्यांच्या सोबत अगस्ती चे संचालक श्री प्रकाश मालूजकर , अशोक देशमुख , बाळासाहेब ताजने आदी उपस्थित होते. प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार व अगस्ती कारखान्याचे संचालक रामनाथ बापू वाकचौरे यांच्या दहा एकर द्राक्ष बागेची ही त्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांना व विमा कंपन्या यांना योग्य सूचना देऊ असे ही आमदार म्हणाले.
मागची दोन वर्षे सातत्याने धोका देणा-या अनियमित निसर्गाने यावर्षीही अकोले तालुक्याच्या सह नगर जिल्हा परिसरातील द्राक्षशेतीला मोठा फटका दिला.ऐन हिवाळ्यात पडलेल्या पावसाने वीरगाव,हिवरगाव,डोंगरगाव,देवठाण,गणोरे, पिंपळगाव ,सुगाव, जवळे कडलाग येथील 250 एकर द्राक्षबागा उध्वस्त झाल्याने द्राक्षबागायतदारांना करोडो रुपयांचा फटका बसला.
कधी बंगालच्या उपसागरात, कधी अंदमान बेटावर तर कधी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने ऑगस्टच्या छाटणीनंतर यंदा सलग ६० दिवस कमीअधिक प्रमाणात पाऊस राहिला.आता डिसेंबरच्या हिवाळी पावसाळ्यात तर सलग दोन दिवस पाऊस चालू राहिला. तापमानचां पारा अकोले ग्रामीण भागात १० डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरल्याने द्राक्ष फळाला मोठ्या प्रमाणावर तडे गेले.खते-औषधे-मजूरी आणि इतरही अनुषांगिक उत्पादन खर्चात सुमारे ३० टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागला.अगदी चोवीस तास बारकाईने निगराणी करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्षपीक हातातून गेल्याने द्राक्ष उत्पादक उध्वस्त झाल्याची माहिती वीरगावचे द्राक्षबागायतदार आणि अगस्ती कारखान्याचे संचालक रामनाथ बापू वाकचौरे यांनी दिली.
अकोले संगमनेर परिसरात शरद सिडलेस आणि थाँमसन सिडलेसची जातीच्या द्राक्षबागा उभ्या आहेत.द्राक्षाच्या घडात पाणी उतरून आता साखर उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.परंतू अचानक झालेल्या पावसाने थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने तापमान घसरले आणि फळांना तडे गेले.करपा,दावणी आणि थ्रीप्सचाही प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला.क्रँकींगमुळे सत्तर टक्के पेक्षा अधिक द्राक्षफळांचे मोठे नुकसान झाले. ही फळे काढण्यासाठी आता मजुरीचाही खर्च वाढला. खराब झालेल्या द्राक्षांचा आता शेतात सडा पडल्याची स्थिती आहे.निर्यातक्षम द्राक्षे पिकवून आणि दरवाढीची शाश्वती असूनही हातात उत्पादन खर्चही पडण्याची शक्यता वाटत नाही.
द्राक्षासाठी एकरी उत्पादन खर्च 3 लाख 50 हजार रुपयांचा झाला.बदललेल्या वातावरणात पिक वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्चही वाढला.वाकचौरे यांचे बागांमधील एकावेळची औषध फवारणी साधारण 30 हजारांची होते.संततधारेच्या या पावसात पिक वाचविण्यासाठी औषधे आणि मजूरी मिळून 5 लाखांचा अधिक खर्च झाला.सध्या द्राक्षाला 100 ते 125 रुपये प्रतिकिलो असा स्थानिक बाजारपेठेचा भाव असून आंतरराष्ट्रीय बाजारात हीच द्राक्षे 175 रुपये प्रतिकिलोने विकली जातात.झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील सोलापूर,सांगली,पंढरपूर,मालेगाव,सटाणा,पेठ-सुरगाणा हा खास द्राक्षबागांचा पट्टा पुर्णपणे नेस्तनाबूत झाल्याने बाजारभाव अधिक भडकण्याची शक्यता असली तरी शेतक-यांच्या हातात काहीही पडंणार नाही.
आढळेतील द्राक्षशेतीचा पीकविमा यावर्षी घेण्यास राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बँकांनीही नकार दिल्याने द्राक्ष उत्पादक अधिक खाईत गेले.देशभरात द्राक्ष पिकाचा विमा उतरविला जात असल्याने अकोले तालुक्यातच ही नकारात्मकता का आहे याचे उत्तर नाही.मागील वर्षी पिकविमा काढला मात्र त्याची भरपाई अद्यापही मिळाली नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्येच अवकाळी पावसाने आढळेतील द्राक्षशेती शंभर टक्के उध्वस्त केली होती.तीच परिस्थिती यंदाही झाली आहे.
शेतीतील इतर पिकांच्या अशाश्वत बाजारभावामूळे शेतक-यांनी फळबाग योजना राबविली. तेल्या, मररोग, गारपीट, अतिवृष्टीच्या तडाख्यात आढळेची डाळींबशेती उध्वस्त झाल्याने द्राक्षशेतीचा धाडसी प्रयोग शेतक-यांनी केला.मात्र सलग तीन वर्षे अनियमीत निसर्गामुळे ऐन बहरात आलेल्या द्राक्षबागा नेस्तनाबूत झाल्याने द्राक्षबागायतदारांची झोप उडाली आहे.
—————————————
” मा.खासदार शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना शेतक-यांना मोठा आधार मिळाला.तेल्या-मर,अतिवृष्टी, गारपीट अशी संकटे फळपीकांवर आली त्यावेळी आमच्या छोट्या वीरगावात साधारण एक कोटी रुपयांपर्यंतची मदत मिळायची.आता मात्र शेतक-यांवरील संकटाकडे केंद्रसरकारचे पुर्ण दुर्लक्ष आहे.सलग तीन वर्षे द्राक्षपीक उध्वस्त झाले.गेल्यावर्षीच्या पीकविम्याची भरपाई मिळाली नाही.यावर्षी तर द्राक्षपीकाचा पीकविमा घेण्यासच नकार मिळाला.पर्यायाने विम्याचा थोडाफार आधारही निघून गेला.याबाबद राज्याचे कृषीमंत्री ना.दादा भुसे यांना प्रत्यक्ष भेटून तक्रारीचे निवेदन देऊन द्राक्षबागायतदारांच्या समस्या मांडणार आहोत.
रामनाथ बापू वाकचौरे
द्राक्षबागायतदार(वीरगाव,अकोले) “.
————————————–