महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुक व पेनचे वाटप करून महामानवास अनुयायांतर्फे विनम्र अभिवादन
राजुरा, ६ डिसेंबर : आजच्या दिवशी वंचित शोषितांचे झंझावते वादळ शांत झाले. संपूर्ण भारतवर्षाकरिता हा दिवस अतिशय दुःखाचा दिवस आहे कारण यादिवशी धगधगता ज्वालामुखी काळाच्या पडद्याआड गेला. अशा महामानव, महाबोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान चौक येथे असंख्य अनुयायांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या छावा फाऊंडेशनतर्फे ज्ञानाच्या अथांग महासागरास अनोखे अभिवादन करत बुक व पेनचे वितरण करण्यात आले. प्रचंड अनुयायांनी सामूहिक त्रिशरण व पंचशीला ग्रहण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती प्रामुख्याने होती. माजी आमदार ऍड. वामनराव चटप, ऍड. संजय धोटे, सिद्धार्थ पथाडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, डॉ. सत्यपाल कातकर, पोलीस ठाणेदार बहादुरे माजी नगराध्यक्ष रमेश नले आदींनी विनम्र अभिवादन केले. तर या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक दुर्गे यांनी केले.
या कार्यक्रमास एपीआय साखरे, आकाश नले, बादल बेले, सचिन भोयर, रूपेश काकड़े, आसिफ सय्यद आदिनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमच्या यशस्वितते कारिता नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत, सुरेंद्र फुसाटे, छावा फाऊंडेशन अध्यक्ष आशीष करमरकर, उपाध्यक्ष बबलू चौहान, सचिव आकाश वाटेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
“माणसाला माणूसपण दाखवणाऱ्या महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम…!”