अखेर सुनील गेडाम यांच्या उपोषणाला मिळाले यश

0
636

अखेर सुनील गेडाम यांच्या उपोषणाला मिळाले यश

🔥 ऑल इंडिया पँथर सेनेचा दणका

 

चंद्रपूर – जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावातील रहिवासी सुनील गेडाम हे तहसील कार्यालयात शेतीच्या फेरफार करण्यासाठी वारंवार चक्करा मारून वैतागून गेले होते.त्यांना तुमची शेती शासन जमा करू अश्या धमक्या मिळत होत्या.मात्र ह्या पोकळं धमक्यांना न जोमानता त्यांनी हा वारंवार अधिकाऱ्यांसोबत घडतं असलेला हा प्रकार ऑल इंडिया पँथर सेनेकडे कथन केला.ऑल इंडिया पँथर सेनेने त्यांना न्याय मिळेपर्यंत लढावं असं ठमकावून सांगितलं. ऑल इंडिया पँथर सेना ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल.तेव्हा सुनील गेडाम यांनी उपोषणाचा स्वतःहून मार्ग अवलंबला व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ पासून सुरवात केली.तसेच त्यांच्या मागण्या जोमाने धरून ऑल इंडिया पँथर सेना रात्रंदिवस सोबतीने जागत होती.अखेर दिनांक १ डिसेंबर २०२१ला त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले. त्यामध्ये रुपेश निमसरकार जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना,उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, युवाध्यक्ष अजयभाऊ झलके, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे यांचे विशेष सहकार्य मोलाचे योगदान आहे.त्याचप्रमाणे सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, उपकार खोब्रागडे तथा समस्त ऑल इंडिया पँथर सेना यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here