अकोल्यात नगर पंचायतीची रणधुमाळी सुरू…कोण मारणार बाजी?
अहमदनगर
संगमनेर दिनांक २९/११/२०२१
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था,यांचे निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. गेल्या पाच वर्ष पूर्वी स्थापन झालेली नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने एक हाती सत्ता ताब्यात घेतली होती. त्या वेळची गणिते वेगळी होती, कारण महाराष्ट्राचे माजी आमदार व मंत्री मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वस्वा होते, तर त्यांचे चिरंजीव वैभव पिचड आमदार होते. २०१९ च्या दरम्यान पिचड पिता पुत्र यांनी भाजपला जवळ केले व पराभवाची नामुष्की ओढून घेतली. शरद पवार यांनी योग्य फासे टाकत आमदार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विजयात अशोक भांगरे, मधुकर तलपाडे यांच्या सह अनेकांचा वाटा असला तरीही, ती निवडणूक जनतेनी हातात घेतली होती . अकोल्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी विकासाच्या बाबतीत पिचड यांना जबाबदार धरत “चाळीस वर्षे गवत उपटत होते का” ,असा प्रतिप्रश्न विचारून सभा जिंकली होती. शरद पवार , अजित पवार यांना मानणारा मोठा घटक तालुक्यात आहे. अकोले तालुका कायम पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला तालुका आहे. २०१४ , २०१९ इतकेच काय तर रामदास आठवले यांना लोकसभेत पाठवण्या करिता भक्कम मताची आघाडी हा तालुका देत आला आहे. श्री भाऊसाहेब कांबळे यांना या तालुक्याने सुमारे ३२ हजाराचे लीड दिल्याचा ताजा इतिहास आहे. याच धर्तीवर विधानसभेचा ही निकाल लागला व भाजपचे वैभव पिचड यांचा राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामटे यांनी दारुण पराभव केला.
अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , भाजप व अलीकडे काँग्रेस ही मजबूत स्थितीत आहे. मनसे ही पाय रोऊन आहे पण फार प्रभावी नाही. राष्ट्रवादी मध्ये गटतट राजकारण मोठ्या प्रमाणात आहे.शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहणार व महा विकास आघाडी पुन्हा एकदा मजबूत होणार असा कयास आहे. तशी अंतर्गत बोलणी चालू असून , नव्याने काँग्रेस पक्ष मधुकर नवले, मिनानाथ पांडे , बाळासाहेब नाईकवाडी , आनंदा वाकचौरे , आदींनी भरारी दिली असून शेजारील संगमनेर तालुक्यातील नामदार बाळासाहेब थोरात जे सांगतील तसा अकोल्यातील काँग्रेस निर्णय घेते. काँग्रेस पक्ष महा विकास आघाडी बरोबर राहणार की एकाला चला रे भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. राज्यात काँग्रेस ने सर्व जिल्हा अध्यक्ष यांना पत्र पाठवून स्वबळाचा सूचना वजा आदेश चा नारा दिला असला तरी ,अकोल्यात बाळासाहेब थोरात हेच अंतिम निर्णय घेतील.
अकोल्यात भाजप ने मुलाखती घेण्यास सुरवात केली असून ,एक पाऊल पुढे टाकले आहे, अकोले शहरात कैलास वाकचौरे यांचे चांगले वजन आहे, त्यांचा मित्र परिवार ही मोठा आहे . सध्या ते पेपरवर राष्ट्रवादी मध्ये तर प्रत्यक्षात भाजप मध्ये आहे. त्यांना मानणारा मोठा घटक तालुक्यात आहे. त्यांची ही कसोटी लागणार असून नगर पंचायत जिंकण्या करिता त्यांनी ही मोठी कसरत चालवली आहे. भाजपला तालुक्यात फार जनाधार नाही. वाढती महागाई, बेरोजगारी , शेतकरी नाराजी, व्यापारी नाराजी यांचे प्रतिबिंब नक्कीच भाजपला मोठा धक्का देऊन जाईल, याला स्थानिक पातळीवर भाजपचे नेतृत्व कसे परतवते हे पाहणे गरजेचे आहे.
मच्छिंद्र धुमाळ हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. जनतेमध्ये जाऊन काम करण्याची संधी ते कधी ही सोडत नाहीत. प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी यांची ही शहरावर चांगली पकड आहे . जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर पाटील यांच्या बरोबर शिवसेनेचा सुर मजबूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी होणार ही काळया दगडावरची रेष आहे. मनसे सध्या तरी स्वतंत्र उमेदवार उभे करून लढेल असे चित्र दिसत आहे.
काँग्रेस चे मधुभाऊ नवले यांची नुकतीच जिल्हा बँकेवर तज्ञ संचालक म्हणून निवड झाली आहे. अमित भांगरे हेही संचालक आहेत.तालुक्यात सहकार चळवळ मोठी आहे. नगरपंचायत ला याचा फायदा मोठा होणार आहे.
डॉक्टर आमदार किरण लहामटे यांची खेळी व डाव योग्य दिशेने पुढे जाताना दिसत आहेत. अजित दादा पवार यांनी लोकनेते ,सहकार महर्षी सीताराम गायकर व आमदार किरण लहामटे यांची एक बैठक घेऊन ,तालुक्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मजबूत केला आहे. लोकनेते गायकर पाटील यांच्यावर काहींनी खालची पातळी गाठून टीका केली, यात त्यांचेच हसू झाले आहे. गायकर पाटील हे मोठे जनाधार असलेले नेते आहेत.युवकांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे. सोशल मीडियावर मोठा वर्ग त्यांचा चाहता आहे.जनाधार असलेले अकोले गावतील मोठे कार्यकर्ते त्यांचे सहकारी आहेत. मराठा, माळी, मुस्लिम मतांचे ते ध्रुवीकरण करणार , मागासवर्गीय , आदिवासी समाज ही आज तरी महा विकास आघाडी सोबत राहणार. डॉक्टर आमदार किरण लहामटे यांनी मोठी विकासाची कामे तालुक्यात केली आहेत. अकोले संगमनेर रस्ता पूर्ण करण्यास त्यांना यश आले आहे. कोरोना काळात सीताराम गायकर व आमदार किरण लहामटे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. जनतेत प्रत्यक्ष फिरून सेवा करत होते, दोघांनी ही अगदी खिशातून लाखो रुपये खर्च करून रुग्णाची सेवा केली आहे. शिवसेना कार्यकर्ते ही त्यांना साथ देत होते. नगरपंचायती ला अलीकडे त्यांनी सरकार दरबारी चांगला निधी मिळवून दिला आहे. आमदार म्हणून त्यांनी अकोले शहरात चांगली विकासात्मक झेप घेतली आहे. याचा मोठा फायदा महा विकास आघाडीला होईल. महा विकास आघाडी पुन्हा एकदा अकोल्यात बाजी मारेल, असा सूर सध्या तालुक्यात आहे. बंडखोरी हा सगळ्याच पक्षांचा किलबिलाट ठरणार आहे. मधुकर नवले, सीताराम गायकर पाटील, डॉक्टर आमदार किरण लहामटे , मच्छिंद्र धुमाळ , मिनानाथ पांडे हे बंडोबा ना थंड करण्यात माहीर आहेत. भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असाच सामना होईल , महा विकास आघाडी ची एकत्रित मते मोठा विजय प्राप्त करून देईल . अजून पुला खालून खूप पाणी जाणार आहे, प्राथमिक अंदाज महाविकास आघाडी कडे असला तरी पिचड पुढे काय राजकारण करतात या वर ही बरेच काही आहे.