छावा फाऊंडेशन तर्फे संविधान दिनी शहरातील वाचनालयात भारतीय संविधानाच्या प्रती भेट
राजुरा, २६ नोव्हें. : छावा फाऊंडेशन राजुरा तर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान दिनी राजुरा शहरातील वाचनालयाला भारतीय संविधानाच्या प्रती भेट स्वरूपात आज दिल्या. संत जगत गुरू तुकोबाराय वाचनालय देशपांडे वाडी, मच्छीन्द्र मत्स्यपालन संस्था भारत लॉज जवळ, अंजली अभ्यासिका कर्नल चौक, हजरत टिपू सुलतान वाचनालय राजुरा येथे प्रत्येकी एक संविधान प्रत वाचनालयाला भेट देण्यात आली.
आज संविधान दिनाचे औचित्य साधून राजुऱ्यातील छावा फाऊंडेशन ने शहरातील विविध अभ्यासिकेला भारताचे सर्वात मोठे ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान च्या प्रती वितरित करून भेट स्वरूपात दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, कोषाध्यक्ष संदीप पोगला, सल्लागार अमोल राऊत, देवकिशन वनकर, सुरेंद्र फुसाटे, लुकेश बुटले, भूषण रागीट आदींची उपस्थिती होती.