दि एन डी हॉटेल चंद्रपूर येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने 4 दिवसीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न

0
721

दि एन डी हॉटेल चंद्रपूर येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने 4 दिवसीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न

 

मॅजिक बस इंडिया फाउंदेशन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्केल प्रकल्प प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सुरू असून बल्लारपूर तालुक्यामध्ये देखील 11 गावातील 17 शाळेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत असून या शाळेतील 27 शिक्षकांचे 4 दिवसीय प्रशिक्षण दि एन डी हॉटेल चंद्रपूर येथे पार पडले.
शिक्षक प्रशिक्षणा करिता बल्लारपूर पंचायत समिती च्या मा, फुलझेले मॅम गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर यांनी योग्य मार्गदर्शन केले तर सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती सर्व, मुख्याध्यापक सर्व यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

4 दिवसीय शिक्षक प्रशिक्षणामध्ये मॅजिक बस इंडिया फाउंडेशन बाबत माहिती स्केल प्रकल्प बाबत माहिती सह वर्ग 6 वि ते 10 वि च्या विद्यार्थ्यांकरिता जीवन कौशल्य शिक्षणाची गरज , शाळेचे ध्येय , जीवन कौशल्य , वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली , जीवनात जीवन कौशल्याचे महत्व यावर आधारित सत्राद्वारे 27 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले या मध्ये प्रशिक्षक म्हणुन अर्जुन काटे , सायली सरफरे यांनी प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षनात मा, फुलझेले मॅम यांनी प्रशिक्षणात भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
तर प्रशिक्षण यशस्वीतते करिता मॅजिक बस फाउंडेशन चे बल्लारपूर तालुका क्लस्टर मॅनेजर नितेश मालेकर, शाळा सहाय्यक अधिकारी संदेश चुनारकर , हंसराज खंडाते, व पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here