माजी आमदर डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी दिभना, खरपुंडी, माडेतुकूम परिसरातील शेताची केली पाहणी

0
699

माजी आमदर डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी दिभना, खरपुंडी, माडेतुकूम परिसरातील शेताची केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे केली मागणी

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्यात मागील दहा ते बारा दिवसापासून धानाची कापणी बांधणीची कामे वेगात सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापनी केली असून कळपा शेतात ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धानाची मळनी करण्याची तयारी केली. तेवढ्यातच अवकाळी पावसाने शनिवारी गडचिरोली तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावली. धानाच्या कळपा ओल्या झाल्या, कापूस पिकाचेही मोठे नुकसान होऊ शकते.

अनेक भागात दमदार पाऊस झाला. मागील दोन – तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांचे कापलेले पीक शेतामध्ये सापडून धान्य खराब झाले व फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांध्यात गुढगाभर पाणी साचले आहे. संपूर्ण धान पीक पाण्यात भिजत आहे.

त्यामुळे समस्त जिल्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक नुकसान सहन करीत आहे. याचा मोठा फटका धान, कापूस पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला तोंडाचा घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पुंजन तयार केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या पुजण्यामध्येही पाणी शिरून धान खराब होण्याची शक्यता आहे. डॉ उसेंडी यांनी दिभना, खरपुंडी, माडेतुकूम परिसरातील शेताची पाहणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी माजी आमदार तथा प्रदेश महासचिव काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here