महापुरुषांचे विचारातून समाजाचा उद्धार करावा
गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांचे प्रतिपादन
टेंबूरवाही येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
राजुरा :- समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रयता, याच बरोबर अन्याय, अत्याचार व शोषण हे समाघातक बाबी समुळ नष्ट करण्यासाठी महापुरुषांचा जन्म हा समाजाच्या उत्थानासाठी झालेला असतो. महापुरुषांना अपेक्षित असलेला समाज हा शोषणमुक्त असला पाहिजे. ह्याच विचाराने महापुरुष हे समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. अशाच समाजपरिवर्तना करिता क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांनी उलगुलान चळवळ उभारुन समाजाला अन्याय, अत्याचाराच्या शोषणातून मूक्त करण्यासाठी बिहार येथे इंग्रज व मनुवादी व्यवस्थेविरोधात लढा उभारला होता. हेच विचार अंगिकार करुन महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाच्या उध्दारा करिता एकत्र येण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापुराव मडावी जिल्हा अध्यक्ष गोंगपा. मो.अब्दूल जमीरभाई शेख, जावेद मुमताज शेख सभापती पं. स. राजुरा, श्री. भिमराव पाटील मडावी अध्यक्ष, ऐ. आ. वि. प्रकल्प आढावा समिती, ममताजी जाधव तालुकाध्यक्ष गो. ग. पा. जिवती, अरूण उदे तालुकाध्यक्ष गो. ग. पा. राजुरा, हनुमंत कुमरे, डॉ प्रकाश वट्टी, येथिल सरपंच गेडाम ताई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बापुराव मडावी यांनी टेंबुरवाही सभागृहाचे लोकापर्णन सोहळा संपन्न झाल्यामुळे गावाच्या विकासासाठी कटीबद्ध असणारे भूमिपुत्र उध्दवराव कुळसंगे यांचे कार्याची दखल घेत सदर सभागृहाच्या बांधकाम निधी करिता किती पायपीट करावी लागली. या सभागृहाचे बांधकाम पेनवासी उद्धव पाटील कुळसंगे यांच्या अथक परिश्रमामुळे पूर्ण झाले आज ते नाहीत तेव्हा सदर सभागृहाचे नामकरण हे पेनवासी उध्दवराव पाटील कुळसंगे हे नाव त्या सभागृहाला देण्यात यावे असा प्रस्ताव ठेवले. तर मा अब्दुल जमीरभाई शेख, यांनी ही भूमी आदिवासींची हा कोळसा आदिवासींच्या हक्कांचा आहे.येथे कोणाच्या बापाची जहागीरदारी नाही परंतु या मूलनिवासी गोंड समाजाचे हक्क अधिकार हिरावून त्याच समाजाला देशोधडीला लावणा-या जुलमी शासनाला धडा शिकविण्यासाठी आदिवासी समाजाने एकत्र यावे व आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे असे मौलिक विचार क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती निमित्ताने व्यक्त केले.
कार्यक्रमाचा शेवट गोंडी पारंपरिक रीतीने सर्व उपस्थित मान्यवरांच्या गाटीभेटी व जय सेवा घेऊन केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री चव्हाण सर व सौ कुळमथे मॅडम यांनी केले तर आभार यांनी मानले.