गोंडपिपरीत २५ कुपोषित बालकांना पोषण आहार किट वितरीत
सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळू संस्थेचा पुढाकार
गोंडपिपरी -(सुरज माडुरवार)
राजूरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यात असलेले कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून येत्या दिवसात या चारही तालुक्यातील कुपोषणासह ईतरही महत्त्वपूर्ण समस्या निराकरणासाठी आम्ही कसोशिने प्रयत्नरत आहोत,असे मत अभिजीत धोटे यांनी व्यक्त केले.ते गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभागृहात सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळू संस्थेच्या माध्यमातून २५ कुपोषितांना “बाळू”च्या किट वाटप उपक्रमात बोलत होते.
राजूरा येथिल सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळू संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून शनिवारी गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभागृहात २५ कुपोषित बालकांना पोषण आहाराची भेट देण्यात आली.यासाठी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांची मदत राहिली.सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थाध्यक्ष अभिजीत धोटे यांनी यासाठी पुढाकार घेतला.अमीत महाजनवार यांच्या “बाळू” संस्थेचे भरिव सहकार्य राहिले.यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, तोहोगाव, विठ्ठलवाडा, आक्सापूर, धाबा या सोबतच गोंडपिपरी बिटातील २५ कुपोषित बालकांना कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पोषण आहार वितरित करण्यात आले.यावेळी राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे,सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे,गोंडपिपरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सावसागडे, महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी शरद पारखी, “बाळू” संस्थेचे संस्थापक विस्तार अधिकारी अमित महाजनवार,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,शंतनू धोटे,युवक काँग्रेसचे संतोष बंडावार, पर्यवेक्षिका शंभरकर, अक्षय सूर्तेकर,पत्रकार समीर निमगडे, नितेश डोंगरे,वेदांत मेहरकुरे,जितेंद्र गोहणे,प्रफुल शेंडे आदिंची उपस्थिती होती