देवस्थानांच्या सौंदर्यीकरणाच्या मंजूर कामांचा निधी तातडीने मिळणार

0
560

देवस्थानांच्या सौंदर्यीकरणाच्या मंजूर कामांचा निधी तातडीने मिळणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई, ता.१०: चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हयातील देवस्थानांच्या सौंदर्यीकरणाचा आणि जीर्णोद्धाराचा प्रश्न निधीअभावी राज्य पर्यटन महामंडळाकडे प्रलंबित आहे. या सर्व मंजुर कामांचा निधी तातडीने मिळावा यासाठी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान भवनात बैठक घेतली. श्री मुनगंटीवार यांच्या मागणीची दाखल राज्य पर्यटन विभागाने घेतली आणि निधी देण्याचे आश्वासन पर्यटन विभागाच्या उपसचिव श्रीमती दांडेकर यांनी बैठकीत दिले.

मूल तालुक्यातील सोमनाथ मंदिराचे सौदर्यीकरण, गोंडपिंपरीच्या धाबा येथील कोंड्या महाराज संस्थानचे सौंदर्यीकरण , यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील केळापुर येथील जगदंबा संस्थानचे रखडलेले काम, मूल येथील रामपूर तलावाचे सौंदर्यीकरण इत्यादी विषयांबाबत श्री मुनगंटीवार यांनी उपसचिव श्रीमती दांडेकर यांच्याशी चर्चा केली व सूचना दिल्यात.

पर्यटन महामंडळतर्फे मंजूर झालेल्या या विकास कामाला निधीची कमतरता का पडतेय याची माहिती त्यांनी जाणून घेतली. सचिव स्तरावर तातडीने हे विषय मार्गी लावावेत, प्रसंगी पर्यटन मंत्र्यांनाही यासंदर्भात बैठक बोलावण्याची विनंती करू असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले. रखडलेल्या कामांना अतिरिक्त निधीची गरज भासल्यास तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात येईल असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here