भाजपच्या पराभवाचे जनते कडून स्वागत… ही तर मोदी शहा यांना दिवाळी भेट….
ज्ञानेश्वर गायकर पाटील
“दीपावली विशेष राजकीय लेख….”
देशातील पोट निवडणुकीत भाजपचा चांगलचं सुफडा साफ झाला आहे. राज्यातील नांदेड येथिल निवडणूक काँग्रेस उमेदवाराने प्रचंड मतांनी जिंकली, वंचित आघाडी चां उमेदवाराने जेमतेम दहा हजार मते घेतली. वंचित आघाडीने सवता सुभा कायम ठेऊन भाजपला मदत होईल अशी चाल खेळली. राज्यातील जनतेने हेच दाखवून दिले की, आम्ही आघाडी सरकारच्या बाजूने आहोत, वाढते पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीला कंटाळलेल्या महिला , शेतकरी , नोकरदार यांनी भाजपला मोठी चपराक दिली. व्होट ऑफ मार्जीन चा विचार ही या ठिकाणी होणे गरजेचे आहे.तो ही फरक मोठा आहे. केंद्रशासित प्रदेश दादरा ,नगर हवेली मध्ये मोदी शहा यांचा मोठा बोलबाला आहे. गुजराथ राज्यातील तसा हा प्रदेश , मोदी शहा जोडगुळीला a
येथे शिवसेनेने आस्मान दाखवले..ते हि मोठ्या फरकाने.शिवसेनेची महाराष्ट्र बाहेर झेप घेतली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. मोठ्या फरकाने भाजपचा पराभव इथे ही पाहायला मिळतो. हिमाचल मध्ये भाजपची सत्ता आहे. लोकसभा मंडी ची जागा भाजप ला राखता आली नाही. विधान सभेत भाजप चे स्पष्ट बहुमत आहे, विधानसभेच्या तिन्ही ही जागा मोठ्या फरकाने काँग्रेस ने जिंकल्या. राजस्थान मध्ये वेगळे घडेल या अशावर असलेल्या भाजपला इथ ही चारीमुंड्या चीत गहोलोत पैलवान यांनी केलं. प.बंगाल मध्ये तर अनामत वाचवताना नाकी नऊ आले.. मध्य प्रदेश , कर्नाटक मध्ये काँग्रेस ने एक एक जागा जिंकली. देशावर कोरोना संकट मोठ होत. ते दूर होऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून पेट्रोल डिझेल वाद व महागाई चे भूत देशातील नागरिकांच्या मानगुटीवर केंद्राने बसवले आहे. भारतीय जनता याला विरोध करत आहे , केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल मध्ये किती मलिदा जमवला याची आकडेवारी आता समोर आली आहे.केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी मध्ये जमवलेली रक्कम काल इंडियन एक्स्प्रेस ने कालच्या अग्रलेखात दिली आहे. त्याचा आपण सविस्तर अभ्यास केला पाहिजे.खालील आकडेवारी मजेदार आहे, पेट्रोल डिझेलच्या नावाखाली जनतेची किती लूट मोदी सरकारने केली ,हे स्पष्ट होते.जी एस टी कलेक्शन ऑक्टोंबर अखेर विक्रमी १.३०लाख करोड झाले, जनता प्रामाणिक प्रयत्न करून सरकारला पैसे देते, सरकार मात्र अप्रामाणिक पने जनते सोबत वागत आहे, व खिसा खाली करत आहे.सेंट्रल एक्साईज कलेक्शन ७९%ने वाढले आहे ,ते तब्बल 171,684करोड आहे.६४.२% ने एकूण उत्पादनात वाढ आहे , मग डिझेल पेट्रोल ची लूट सरकार का करत आहे?केंद्राने तब्बल १.७१ लाख कोटींची असुरी कमाई केवळ सहा महिन्यात केली आहे. सरकारी कर्मचारी यांचा महागाई भत्ता ही हडप केला. मोदी सरकार इतकं लुटारू सरकार या देशात अद्याप झाले नाही. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीला कंटाळलेल्या भारतीय नागरिक पंपावर गेल्यावर दोन शिव्या मोदींना घालतो.त्यांच्या फोटो कडे पाहून अत्यंत घृणास्पद बोलतो, याची प्रचिती कालच्या निकालात दिसली.
एकूण २९ विधानसभा पोट निवडणुका मध्ये भाजपच्या ७ जागा विरोधकांनी पटकवल्या आहेत. लोकसभेची तीन पैकी एकमेव जागा जिंकता आली, ती ही कमी फरकाने. भाजप चे विजयी उमेदवार अगदी काठावर निवडून आलेत, तर विरोधकांचे भारी मतांनी विजयी उमेदवार झालेत, हे सुध्दा महत्त्वाचे आहे. भाजपचा आयटी सेल खोट्या बातम्या पसरवण्यात ,दिशाभूल करण्यात कुकर्मी आहे.लोक आता त्यांच्या पोस्ट ही वाचत नाही.थोडक्यात काय तर लोकांना यांची बनवाबनवी माहिती पडली आहे.अजित पवार यांची इतकी संपती जप्त केली ही पोस्ट काल भाजप आयटी सेल फिरवत होता, साधा कायदा माहिती नसलेले हे भक्त बिनडोक पने काम करतात व त्याच पक्षाला खड्ड्यात टाकतात.विनोद राय नावाचा मूर्ख अधिकारी कोर्टात माफिपत्र देतो व मनमोहन सिंग यांचे सरकार बदनाम केले , अस्थिर केले हे कबूल करतो…
महागाईने आम् जनतेचे कंबरडे मोडले आहे, याला जबाबदार पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ आहे, काल व्यावसायिक गॅस सिलेंडर चक्क २५०₹ ने वाढला. छोटे व्यावसायिक यांनी काय करायचे, तोंड झोडण हाच पर्याय आहे. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकार , केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले पाहिजे. गुजराथ मधील मुंद्रा अदानी पोर्ट वर ३००० किलो ड्रग सापडले, त्याची चर्चा नको म्हणून, मुंबईची बोलिहुड बदनाम केली जाते. वानखेडे यांच्या सर्वच घटना संस्यास्पद आहेत. राज्य सरकारने आता त्यांची कसून चौकशी केली पाहिजे.परमवीर पळून गेला, या मागे मोठ षडयंत्र आहे. राज्य सरकार ने आता मुठी आवळल्या पाहिजेत. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्ये राज्यात भाजप दिसणार नाही, इतकी व्यवस्था जनता व राजकीय पक्ष यांनी करावी, त्या शिवाय मोदी यांना चाप बसणार नाही, इतकं नक्की….