शरदराव पवार महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर- शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री आनंद गणपत नळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह व आयोजक म्हणून महाविद्यालयाचे मुख्य लिपिक शशांक नामेवार उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती श्री आनंद नळे व ,त्यांच्या पत्नी शालिनीताई नळे यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व भेटवस्तू तथा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने ही सत्कार मूर्तींचा सत्कार शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. आनंदराव अडबाले म्हणाले लिपिक हा महाविद्यालयाचा आत्मा असतो श्री आनंद नळे हे चाकोरी बद्ध काम करणारे व महाविद्यालय प्रती व कामाप्रती निष्ठा ठेवणारे लिपिक होते यावेळी वेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.संजय कुमारसिंग यांनी प्रशासकीय कामकाजाविषयी आपली भूमिका व्यक्त करून श्री आनंद नळे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ.संजय गोरे आणि डॉ.हेमचंद्र दुधगवळी यांनी वरिष्ठ लिपिक श्री आनंद नळे यांच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकून श्री नळे हे विध्यार्थी यांच्यासाठी झटणारे लिपिक होते हे सांगून त्यांच्या भावी आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या.आयोजक म्हणून आपल्या प्रास्ताविकातून मुख्य लिपिक शशांक नामेवार यांनी आयोजनाची भूमिका विशद करून प्रशासकीय कामकाजातील अडचणी मांडल्या त्याचबरोबर श्री नळे यांच्या कार्याची प्रशंसा केली सत्काराला उत्तर देताना श्री आनंद नळे यांनी महाविद्यालयाप्रति कृतज्ञता व्यक्त करून प्राचार्य. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची मदत झाल्याचे सांगितले तसेच सेवानिवृत्तीनंतरही महाविद्यालयाच्या विकासासाठी मी योगदान देत राहील असे अभिवचन दिले या निरोप समारंभासाठी विशेष करून संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे ,उपाध्यक्ष तुळशीरामजी पुणेकर सहसचिव श्री विनायकराव उरकुडे,संस्थेचे सदस्य नोगराजजी मंगरूळकर,माधवराव मंदे प्रामुख्याने उपस्थित होते या निरोप समारंभासाठी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती श्री आनंद नळे आणि शालिनीताई नळे यांना सजवलेल्या गाडीमध्ये बसवून त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यात येऊन त्यांच्या भावी आऊष्यासाठी शुभेच्छा महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन प्रा.मंगेश करंबे तर आभार श्री विनोद उरकुडे यांनी मानले. या निरोप संभारंभ कार्यक्रम साठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.