नांदगाव येथे असंसर्ग जन्य रोग निदान कॅम्प चे आयोजन
आज दिनांक 29/10/2021 रोजी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही, उत्तम कापुस प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर गाडेगाव (कावठाला) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथे असंसर्ग जन्य रोग निदान कॅम्प चे आयोजन करण्यात आले. या कॅम्प चे अध्यक्ष माननीय विजय भाऊ निखाडे गावचे प्रथम नागरिक, ग्रामपंचायत सदस्य श्याम भाऊ कोलांडे, प्रविण टिपले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल कातकर, अंगणवाडी सेविका गीताताई कवठे, अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही येथील हेल्थ डिपार्टमेंट चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, आरोग्य विभागाच्या CHO श्वेता देवगडे तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी व उत्तम कापुस प्रकल्प चे कर्मचारी हजर होते. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कॅम्प पार पाडण्यात आला. या कॅम्पमध्ये वय वर्ष 30 वरील लाभार्थ्यांनी या कॅम्प चा लाभ घेतला. अशाच प्रकारचे कॅम्प भोयगाव, कावठाला, नांदगाव, एकोडी या गावातील पध्दतीने कॅम्प घेण्यात आला.