पेट्रोल डिझेल गॅस दर वाढ विरोधी राकाँ युवक काँग्रेसचे आंदोलन
कोरपना, प्रवीण मेश्राम
२० ऑक्टो. : आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकार देशातील सामान्य जनतेला वेठीस धरत पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ केली आहे. त्या विरोधात युवकांनी “धोरण मोदींचे, मरण जनतेचे”, “मोदीजी नही चाहिए अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दीन”. या आशयाचे नारे देत केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचांदुर शहराध्यक्ष आकाश वराटे, आसिफ किडिया, मयूर एकरे, वैभव गोरे, सलीम शेख, निखिल एकरे, करण सिंघ, सादिक शेख, मेघराज एकरे, सूरज पिंगे, बादल पेचे, राहुल चुरे, सागर ताडे, अंकुर, स्वप्नील, अनुराग जोगी, अमोल गोखरे, अक्षय मेश्राम, अरूण सातपडे, सदानंद गिरी, विनेश देठेकर, राकेश उमरे, नितेश देथे, बंडू पाचभाई, दिनेश डांगे इत्यादी शहारातील युवक उपस्थित होते.