अखेर वाहून गेलेल्या राजूचा मृतदेह सापडला एका शेताजवळ
वणी/यवतमाळ, मनोज नवले
वणी तालुक्यातील घोन्सा येथील राजू श्रीहरी बोरकुटे हा व्यक्ती देवीचा घट विसर्जन करण्याकरीता गेला असता. पाय घसरून नदीत पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.
गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न देखील केले मात्र पाण्याचा प्रवाह असल्याने राजू पुराच्या पाण्यात वाहून गेला. राजू चा काल पासून शोधही सुरू होता मात्र त्याचा काही थांगपत्ताही लागला नाही.
मात्र प्रशासनाने NDRF च्या ला पाचारण करण्यात आले. आणि आज सकाळी 9 वाजता 11 जणांची NDRF ची टीम घोन्सा येथे दाखल झाली. आणि राजू चा शोध मोहिमेला सुरुवात केली. मात्र गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर 1 वाजता राजूचा मृतदेह अनंता काकडे यांच्या शेताजवळ आढळून आला.
राजू बोरकुटे (50) हा बाहेरगावचा रहवासी असून. तो घोन्सा येथे एका शेतकऱ्याकडे काम करीत होता सालगड्याचे काम करीत होता. परतीच्या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने राजू वाहून गेल्या असल्याची माहिती यावेळी गावकऱ्यांनी दिली. गावकऱ्यांनी नदीपात्रात याचा शोध देखील घेतला मात्र त्यांना यश काही आले नाही. व याबाबत गावकऱ्यांनी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाला माहिती दिली. मात्र राजू च पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राजूच्या अशा जाण्याने गावात पूर्णता शोककळा पसरली आहे.