कडमन्यात भिषण सडक दुर्घटना
● बल्लारपूर, आष्टी महामार्गावरील घटना
● अपघातात दोघांसह बैल जागीच ठार
● गावकऱ्यांनी चार तास अडवून धरला राज्य महामार्ग
बल्लारपूर (चंद्रपूर), राज जुनघरे : बल्लारपूर ते आष्टी, आल्लापल्ली या राज्य महामार्गावर आज सकाळी 9 वाजताचे दरम्यान मोठी दुर्घटना घडली. यात दोन व्यक्ती सह बैल जागेवरच ठार झाले. घटनेनंतर लगेच कडमना स्थीत नागरिकांनी राज्य महामार्ग अडवित मार्ग बंद पाळला. आणि जन आक्रोश उफाळून आला होता. मृतकांना तात्काळ मदत व मार्ग सुरक्षा हा गंभीर प्रश्न घेऊन कडमना वासीयांनी महामार्ग अडवून धरल्याने तब्बल चार तास राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
बल्लारपूर – आष्टी, आल्लापल्ली राज्य महामार्गावर कडमना येथे बुधवारला सकाळी 9 वाजताचे दरम्यान भिषन अफघात घळला. यात कडमना निवासी शेतकरी व शेतमजूर आपल्या बैल बंडीने शेतात जाण्यासाठी निघाले असता कोठारी कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैल बंडी स्वारास चिरडले आणि ट्रक सहीत ट्रक चालक पसार झाला. यात कडमना निवासी शेतकरी पुंडलिक शंकर काडे वय 60 वर्ष, शेतमजूर अंबादास दूधकोहळे वय 62 वर्ष,व बंडीला जुंपलेला एक बैल जागीच ठार झाले. मृतदेहाची अवस्था छिन्नविछिन्न झाली असल्याने भरधाव वाहनाची गती अनियंत्रित असल्याचे समजते. घटनेची चाहुल लागताच कडमना गाव एकवटला गेला आणि मुख्य राज्य महामार्ग अडवून धरला. पोलिस यंत्रणा घटना स्थळांवर हजर होयी पर्यंत जमावाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपस्थित जमावाने व मृतांच्या नातेवाईकांनी वाहन मालक घटना स्थळी येवून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणार नाही.व राज्य महामार्ग विभाग गतीरोधक व द्विभाजक लावण्यास तयार होत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही. अशी आग्रही मागणी लावून धरली होती. जमावाचा आक्रोश पाहता हतबल झालेल्या बल्लारपूर पोलिसांनी कोठारी येथून अतिरिक्त कुमक मागवली. याचवेळी घटना स्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार , बल्लारपूर चे तहसीलदार संजय रांईचवार, पि.आय. उमेश पाटील, ए.पी.आय. विकास गायकवाड, रमीद मुलाणी, शैलेंद्र ठाकरे , कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण आपल्या पोलिस ताफ्यासह दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांनी नातेवाईकांची सांतवना करीत व गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्य राज्य महामार्गावर गावाच्या रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक व द्विभाजक लावण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन तब्बल चार तासांनंतर अपघातातील मृतदेहांना उतरीय तपासणीसाठी बल्लारपूर कडे रवाना करीत राज्य महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.