तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पळविली रुग्णवाहिका
परत पाठविण्याची मागणी ; नागरिकात रोष
बल्लारपूर (चंद्रपूर), राज जुनघरे
स्थानिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेली आणि यापुर्वी रुगणांनसाठी जिवनदाहीनी ठरलेली १०८ रुग्णवाहिका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बल्लारपूरात आपल्या दिमतीला ठेवली असुन राज्य मार्गावरील प्रमुख आरोग्य केंद्रासह रुग्णांना,अपघातग्रस्ताना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांरी व जिल्हा व्यवस्थापकांच्या संगनमताने कोठारी आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका पळविली असल्याने परिसरातील नागरिकांत रोष व्यक्त केल्या जात आहे.कोठारी आरोग्य केंद्रात मुक्कामी रुग्णवाहिका परत कोठारीत दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बल्लारपूर-आष्टी, राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी येथील आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका १०८ मागिल तिन महिन्यांपासून स्थानिक केंद्रातुन गायब झाली आहे. मुख्यत्वेकरून सदर रुग्णवाहिका ही कोठारी परिसराची भौगोलिक परिस्थिती व रोजचे अपघात तसेच रुग्णांची संख्या पाहता कोठारी आरोग्य केंद्राच्या नावे देण्यात आली होती.
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या व टाळेबंदीच्या काळात १०८ या रुग्णवाहिकेची व त्यावरील चालकांची कामगीरी प्रशंसनीय आहे. त्यातच स्थानिक आरोग्य केंद्र मुख्य राष्ट्रीय महामार्गालगत असून दैनंदिन अपघात होत असल्याने रुग्णवाहिकेचा मोठा लाभ होत असतो. अपघातातील रुग्णाना जिल्हा रुग्णालयापर्यत या रुग्णवाहिकेने महत्वाची भुमिका बजावलेली आहे. सदर आरोग्य केंद्राला ही रुग्णवाहिका मिळाल्यापासून वरदान ठरली होती. मात्र मागील तिन महिन्यांपासून येथील रुग्णवाहिका तालुका वैद्यकीय अधिकारी व १०८चे जिल्हा व्यवस्थापक यांनी शहरी भागात आरोग्य सेवा व यंत्रणा मुबलक प्रमाणात असताना पळविली व ग्रामीण रुग्णालयाच्या दिमतीला ठेऊन कोठारीतील रुग्णांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याने परिसरातील नागरिकांत असंतोष निर्माण झालेला आहे.
कोठारी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागील तिन महिन्यांपासून स्थानिक स्तरावर उपलब्ध नसल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास येवून सुद्धा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, रुग्ण कल्याण समिती समिती चे सभासद मुंग गिळून गप्प कां ? असा सवाल नागकानी उपस्थित केला आहे. कोठारीतून पळविण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका त्वरित कोठारीत परत न पाठविल्यास गावकर्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा गर्भित इशारा गावकर्यानी दिला आहे.
“कोठारीतील १०८ रुग्ण वाहिका बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात असून त्यास कोठारीत परत पाठविण्यास काहीही हरकत नाही. बल्लारपुरात रुग्ण वाहिका आहे. गरज पडल्यास नगर पालिकेकडून मागविण्यात येईल किंव्हा कोठारीतून मागविला येईल. तिला कोठारीतून बल्लारपुरात येण्यास पंधरा मिंटाचा केवळ अवधी लागेल.”
– गजानन मेश्राम
अधीक्षक, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय