वणीत बेटी फाउंडेशन चा लहान मुलगी विकण्याचा डाव फसला…
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
यवतमाळ जिह्याच्या वणी तालुक्यातील घटना
वणी/यवतमाळ, मनोज नवले
पैशाच्या हव्यासापोटी लोकांना नेहमी लुबाडत असे. विविध लोकांच्या संपर्कात राहून कमी वेळात जास्त पैसा कमविला. तसेच लोकांकडून पैसे घेऊन पुरस्कार देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. आता तर बाळाची विक्री करून लाख रुपये मिळविण्याचा डाव मात्र चांगलाच फसला व पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
मागील चार दिवसांपासून 15 दिवसाचे बाळ दत्तक देणे आहे. असा संदेश सोशल मीडियावर पसरला. याची माहिती बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आरोपी बेटी फाउंडेशन ची संचालक प्रीती (माडेकर) दरेकर यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर बोलणे केले. त्यांना बाळ विक्रीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यवतमाळ चे पोलीस निरीक्षक बबन कराळे यांना माहिती दिली. यवतमाळ पोलीस पथक व पल्लवी कुलकर्णी यांनी 30 सप्टेंबर ला सायंकाळी रंगनाथ परिसरात मुख्य आरोपी प्रीती दरेकर यांच्या घरी सापळा रचला. बाळाची विक्री होत आहे असे लक्षात येताच पोलिसांना इशारा केला व रंगेहात पकडले.
मुख्य आरोपी अध्यक्ष बेटी फाउंडेशन प्रीती कवडू दरेकर (28), कवडू गजानन दरेकर (35), गौरी गजानन बोरकुटे (35), मंगला किशोर राऊत (44) यांना व बाळाच्या आई वडील यांनाही अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधार आरोपी प्रीती दरेकर हिने तीन लाख पन्नास हजार रुपयेला विक्री करून बाळाच्या आई वडील यांना एक लाख वीस हजार रुपये देणार होती व बाकीचे पैसे आपसात वाटून घेणार होते.
बाळ विक्रीचा डाव उधळणाऱ्या फिर्यादी अकोला येथील बाल संघटनेच्या अध्यक्षा पल्लवी कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून आरोपीवर भांदवी 370 नुसार मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 81, 87 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही वर्षपासून मुख्य आरोपी प्रीती (माडेकर) दरेकर या बेटी फाउंडेशन च्या नावावर लोकांची लूट करत होती. तसेच अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे काम करत होती अशी माहिती सगळे नागरिक सांगत आहे. मागील 5 वर्षापासून पैसे घेऊन पुरस्कार वाटण्याचे काम करत होती. 5000 रुपये द्या रणरागिणी पुरस्कार घ्या. तसेच मागच्या वर्षी भारत भूषण पुरस्कार दिला. यावर्षी 26 सप्टेंबर ला वणीच्या प्रिन्स लॉन मध्ये बेटी फाउंडेशन चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला. वणीतील गनमान्यव्यक्ती कार्यक्रमात सहभागी होते. आरोपी प्रीती दरेकर ही सेक्स रॅकेट पण चालवते अशी खमंग चर्चा नागरिक करत आहे.