अवैध धंदे तात्काळ बंद करुन बेकायदेशीर धंदयांना प्रोत्साहन देणाऱ्या दोषी पोलीस कर्मचार्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी
मा. पोलीस अधीक्षक साहेब औरंगाबाद (ग्रामीण) यांना बहुजन समाज पार्टी फुलंब्रीच्या महिला अध्यक्षा पुष्पाताई मोरे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन
कारवाई न झाल्यास तहसील कार्यालय फुलंब्री समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा
औरंगाबाद/फुलंब्री : दिनांक १०/०८/२०२० रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी संजय चव्हाण ब.नं.1151 व जयसिंग नागलोद ब.नं.896 यांच्या संगमताने आर्थिक लालसे पोटी परीसरात विभिन्न ठिकाणी अवैध देशी विदेशी दारूची विक्री, गौण खनिजाची अवैध वाहतूक, मटका बुकी, गुटखा विक्री सह इतर बेकायदेशिर धंदे सर्रासपणे चालत असल्याने सदरील अवैध धंदे चालकांवर कोणतीही ठोस कारवाई स्थानिक पोलीसांकडुन होतांना दिसत नाही. फक्त वेळोवेळी कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ अधिकार्यांच्या पथका मार्फत व गुन्हे शाखा मार्फत बेकायदेशीर धंदे करणार्यांवर छापा टाकून कारवाई करण्यात येते. परंतु ज्यांच्या हद्दीत सदरील अवैध धंदे बोभाट पणे चालत आहे अशा स्थानिक पोलीसांकडुन कारवाई न होणे याचे मागचे गौडबंगाल काय? सदरील अवैध धंदयांना आर्थिक लालसे पोटी वरील कर्मचारी प्रोत्साहन देत असल्याने परीसरात गुंडाराज वाढत असुन सदरील अवैध धंद्यांची आहारी सामान्य नागरीकांचे कुटुंब बळी पडत आहे, एकी कडे कर्तव्य निष्ठ वरीष्ठ पोलीस अधिकार्यांकडुन अवैध धंदे बंद करण्याची हाक देण्यात येत आहे तर दुसरी कडे स्थानिक पोलीसांकडुन अवैध धंदे वाल्यांची साथ देण्यात येत असल्याने परीसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, म्हणुन सदर प्रकरणात कार्यवाहीस्तव पक्षा तर्फे दिनांक १०/०८/२०२० रोजी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही
तर अशा वेळेस मा. साहेबांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत व त्यांचे सहकार्य पो.कॉ. संजय चव्हाण, ब.नं.1151,पो.कॉ.जयसिंग नागलोद ब.नं. 896 यांच्या आर्थिक संगमताने सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करुन बेकायदेशीर धंदयांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचार्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. न्याय मिळवून द्यावा. नसता प्रकरणात लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पक्षा तर्फे फुलंब्री तहसिल कार्यालय समोर दिनांक ०७/०९/२०२० सोमवार रोजी पासून अमरण उपोषण सुरू करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपल्यावरील राहील याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन बसपा फुलंब्रीच्या महिला अध्यक्ष पुष्पाताई मोरे यांच्या नेतृत्वात मा.पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
प्रतिलिपीत मा. जिल्हाधिकारी साहेब औरंगाबाद, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साहेब (ग्रा) औरंगाबाद, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब फुलंब्री/औरंगाबाद, मा. तहसिलदार साहेब फुलंब्री यांनाही निवेदनातून मागणी सदर मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.