विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालयातर्फे दोन नवीन उपक्रमांची सुरुवात
वणी (यवतमाळ) मनोज नवले
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला ‘माझं गाव माझा वक्ता’ या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी व ‘आपले गाव आपले कवी’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याला दोन कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
या महिन्याच्या चौथ्या रविवारी दि. 26 सप्टेंबरला नगर वाचनालयात सायंकाळी 7 वाजता माझं गाव माझा वक्ता अंतर्गत पाहिले पुष्प विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड ‘पुराण वाड्मय आणि विज्ञान’ या विषयावर पाहिले पुष्प गुंफणार आहेत.
आपले गाव आपले कवी या उपक्रमाची सुरुवात ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी होणाऱ्या या साहित्यिक मेजवाणीचा वणीकरांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.