वर्षा अखेर पर्यंत दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्राकरिता स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचे होणार काम सुरू
चंद्रपूर : मौजा दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांची पाण्या संदर्भातील गैरसोय दूर व्हावी याकरिता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी प्रत्यक्ष भेट घेत नवीन व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती, त्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्र्यानी दिनांक ०८ जुन २०२१ ला जलजीवन अभियानाचे संचालक यांना तात्काळ कार्यवाही करणेबाबत निर्देश दिले होते. पाणीपुरवठा मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानंतर जलजीवन विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या इतर भागातील सर्वेक्षनात दुर्गापूर चा देखील समावेश करण्यात आला असुन प्राधान्याने दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील भागाचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.
त्याच अनुषंगाने आज चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एम. बारसागडे यांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा केली. चर्चेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वार्डातील एकूण नागरिकांसंदर्भातील सर्वेक्षणात लोकसंख्येनुसार (सद्यस्थितीत असलेले एक कुटुंब त्यातील ५ सदस्य याप्रमाणे) पुढील १५ वर्षांचे वाढीव नागरीकीकरनाचे लक्ष ठेवीत योजनेला मंजुरी देण्यात येऊन दिवाळी नंतर वर्षाअखेरी पर्यंत सदर योजनेसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल व लवकरच काम सुरु होईल असे कार्यकारी अभियंता यांच्यातर्फे शिष्टमंडळाला सांगण्यात आले असुन ग्रामपंचायतिने नवीन पाण्याची टाकी व यंत्रणेकरिता उंचावरील जागा उपलब्ध करून द्यावी असे देखील सुचविले.
सदर शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच पुजाताई मानकर, रा. यु. काँ. जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, माजी सदस्य राजेंद्र मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांडाळे, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, उपसरपंच असिफ शेख, सपणाताई शार्दूल गणवीर व सद्स्य उपस्थित होते.