आष्टी परिसरात बिबट्याची जोरदार दहशत
बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वनसंरक्षक अधिकारी यांच्याशी जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार यांनी केली चर्चा
चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दिवसेंदिवस जोरदार दहशत पसरली असून चपराळा वन्यजीव अभयारण्यातील बिपट्या मानवी हल्ले करीत आहे. दिनांक 13.9.2021रविवार रोजी आष्टी पेपर मिल कॉलनीतील अंश मोरे या मुलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच मार्कंडा (कं) येतील वन विकासाच्या जंगलात भंगाराम तळोधी येथील मेंढपाळाच्या मुलास आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बिपट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली. अनखोडा येथे कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली.
दिवसेंदिवस या बिबट्या हल्ले वाढतच चालली आहे. आष्टी परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाने मुश्किल झाले आहे.सर्वत्र परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. करीता वन विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद बंद करण्यात यावे. या करीता जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांनी मारकंडा कं येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वनसंरक्षक अधिकारी आलापली यांचेशी चर्चा केली. यावेळी मारकंडा (कं) गामपंचायत सरपंचा वनश्री चापले व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.