पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वणी यवतमाळ मनोज नवले :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालयात उमरखेड चे विध्यार्थी कृषीदुत अंकुश विनोद घोसले यांनी तालुक्यातील हिवरी येथील अंकीत गौरकर यांचे शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख अवघ्या देशात असून याच जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात सुद्धा कपासी पिकाची लागवड जवळपास 90% आहे.कपासी पिकावर आता गुलाबी बोंड अळीची सुरुवात झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.कापूस पीक साधारण 40 ते 45 दिवसाचे झाल्यानंतर पिकांवर बोंड अळीची प्रादुर्भाव दिसून येतो.मागील वर्षा प्रमाणे याही वर्षी गुलाबी बोंड अळी मूळे नुकसान होवु नये म्हणून शेतकऱ्यांनी कपासी पिकात हेक्टरी 6 ते 7 कामगधं सापळे लावावी.आदी विषय कृषीदूत अंकुश विनोद घोसले यांनी तालुक्यातील हिवरी येथील अंकित गौरकार यांचे शेतात प्रत्यक्ष भेट दिली.व उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रनासाठी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन शिबिर प्राचार्य एम. के.चिंताळे,प्रा. वाय.एस.वाकोडे,प्रा. इंगळे, प्रा.राऊत,यांच्या पुढाकाराने कृषीदूत अंकुश विनोद घोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरी येथे संपन्न झाले.