नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य उल्लेखनियच – प्रभावती नागापूरे
चंद्रपूर, किरण घाटे वि.प्र. : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील राजू-याच्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य फारच उत्तम व उल्लेखनिय असल्याचे मत या जिल्ह्यात सर्वप्रम डिएड हाेण्यांचा मान मिळविणां-या तथा सेवा निवृत्त भद्रावतीच्या वयाेव्रूध्द शिक्षिका प्रभावती नागापूरे यांनी व्यक्त केले .त्या राजूरा येथील किसान भवनात आयाेजित घरकाम करणां-या महिला सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बाेलत हाेत्या .हा कार्यक्रम नुकताच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजूरा तर्फे आयोजित करण्यांत आला हाेता .घरकाम करणा-या असंख्य महिला आपल्याच कुटुंबातील एक घटक असल्याचे मनाेगत भूतपूर्व जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी याच कार्यक्रमातुन बाेलतांना व्यक्त केले .कार्यक्रमाला विलास कुंदाेजवार , दिलीप सदावर्ते , रजनी शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हाेते .
आयाेजित कार्यक्रमाच्या आरंभीच अल्का सदावर्ते यांनी आपल्या प्रास्ताविकेतुन नेफडाे तर्फे राबविण्यांत येणा-या विविध उपक्रमाची माहिती विशेद केली .या वेळी नेफडाेच्या वतीने २३घरकाम करणा-या महिलांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यांत आला . सदरहु कार्यक्रमाला जिल्हा संघटक विजय जांभुळकर , तालुका अध्यक्ष संतोष देरकर , राजश्री उपगन्लावार , मनाेज तेलीवार , वर्षा काेयचाडे , प्रतिभा भावे यांचेसह अनेकांची उपस्थिती हाेती .कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता मेघा धाेटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बादल बेले यांनी मानले . पार पडलेल्या या कार्यक्रमाची राजूराकरांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली .