राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ही ट्विटर अकाऊंट केले बंद… आम्ही लढू, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया !

0
845

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ही ट्विटर अकाऊंट केले बंद… आम्ही लढू, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया !

अहमदनगर

संगमनेर दिनांक १२/८/२१

ज्ञानेश्वर गायकर पाटील

महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दर्शवत ‘मैं भी राहुल’, असं ट्विट राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्या नंतर केलं होतं. राहुल गांधी यांनी नियमांचं भंग करणारा फोटो शेअर केला होता, त्याच फोटोला पाठिंबा दर्शवणारं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केल्याने त्यांचंही ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे.

 

नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. ट्विटर ही आंतररष्ट्रीय कंपनी असूनही भाजपच्या दाबवाखाली काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरुच ठेऊ, हम लढेंगे, असा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.

 

ट्विटर हे एक समाज माध्यम आहे. त्यावर आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या मांडण्याचा अधिकार राज्य घटनेमध्ये आहे. त्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आम्ही ट्विटरच्या माध्यमातून करत होतो. मात्र ट्विटरने काँग्रेस नेत्यांच्या ट्विटरवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. भाजपाच्या दबाव खाली काम करणे योग्य नाही. त्यामुळे एकंदरच कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चाललेली आहे, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

दरम्यान संगमनेर येथे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून , काँग्रेस कार्यकर्ते पुढे काय निर्णय घेतात, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस , युवक काँग्रेस किती आक्रमक होते ,हे दोन दिवसात सिध्द होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here