अन्नपुरवठा मंत्रालयातून घुमलाय चंद्रपुरात फोन प्रहार चे बिडकर यांच्या प्रयत्नाला यश
नऊ महिन्यांचे काम झाले दोन दिवसात गावकऱ्यात आनंदाचे वातावरण
जीवती. प्रतिनिधी
जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा येथील स्वस् धान्य दुकानदार अनिल माधव मोतेवाड दिनांक १२/११/२०२० रोजी सिल करण्यात आले परंतु आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानाचा नविन जाहीरनामा न लागता परत स्वस्त धान्य दुकानदार अनिल माधव मोतेवाड यांना पुर्ण चौकशी न करता जोडण्यात आले . ऑक्टोबर महिण्याचे मोफत धान्य वाटप न करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांनी तक्रार केली असता चौकशी करुन कार्यवाही करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकान निलंबीत करण्यात आले व तात्पुरते अण्णाराव मोरे यांच्याकडे जोडण्यात आले होते परंतु राशन दुकानाचा नविन जाहीरनामा न लागता राशन दुकानाची आर्डर अनिल माधव मोतेवाड यांना पुर्ण चौकशी न करता कशीकाय जोडाण्यात आले. अशी चर्चा गवकऱ्यात सुरू झाली सर्व गावकऱ्यानी हे राशन दुकानदार पाहीजे नाही अशी टोकाची भूमिका घेतली आदीवासी पेशा अंतर्गत असलेले गाव स्वस्त धान्याचे दुकान आदिवासी यांना जोडण्यात यावे आणि नविन जाहीरनामा प्रसिध्द करण्यात यावा अनिल माधव मोतेवाड यांचवर योग्य ती कार्यवाही करुन यांचा राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण गावकऱ्यांनी आधी दिलेल्या निवेदनात केली मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही.
त्या काही युवक गडचांदूर येथील प्रहारचे सतीश बिडकर यांना भेटून लेखी तक्रार दिली बिडकर यांनी कोणताही वेळ न घालवता जिल्हा पुरवठा अधिकारी यांना फोन करून विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली बिडकर यांनी तत्काळ अन्न पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब यांना फोन वर माहिती दिली मंत्री महोदयांनी सर्व पत्रव्यवहार मागवून घेतले व दुसऱ्यादिवशी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांना मंत्रालयातून फोन आला व लगेच मोतेवाड यांच्या कडून ऑर्डर काढून पुन्हा मोरे यांच्या कडे जोडण्यात आले असे पत्र गावकऱ्यांना पाहून मोठा आनंद झाला गावकरी परमेश्वर वाघमारे, योगेश पट्टेवाले, देवराव मडावी, लचू मडावी, अनिल वाघमारे, लक्ष्मण मडावी आयु कोडपे, बालू पाटील कोडापे, सुनील वाघमारे, गोविंद मोरे आदी सर्व गावकर्यांनी बिडकर यांचे आभार मानले
##### जो पर्यंत नवीन राशन दुकानाचा नवीन जाहीरनामा लागणार नाही व दुसऱ्या दुकानाला ऑर्डर मिळणार नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही
सतिश बिडकर माजी तालुका अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष ####