गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत सुरवातीलाच गोंधळ
विद्यार्थ्यांची तारांबळ, सर्व्हर डाऊनमुळे सायंकाळ पर्यंत कसरत
गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली: स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने १० ऑगस्ट मंगळवार पासून ५ पाळी मध्ये ऑनलाईन पद्धतीने उन्हाळी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पाळीतील परिक्षा व्यवस्थीतपणे सुरू झाली. परंतु ३हजार २४४विद्यार्थ्यांचे पेपर आटोपल्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमाचे सर्व पेपर स्थगित करून ते सायंकाळ पाळीत घेण्यात आले.
बि. ए, बि.एस्सी, बि.काॅम आदी पदवी स्तरावरील तिनही वर्षाच्या ऑनलाइन परिक्षा आयोजित करण्यात आल्या. सकाळी १०वाजता विद्यार्थ्यांनी परिक्षेची लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ति उघडत नसल्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना आला. एक तास प्रतिक्षा करूनही लिंक न उघडल्याने अखेर विद्यापीठ प्रशासनाने एका तासानंतर पुन्हा परिक्षा घेण्याचे जाहीर केले. काही विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरपत्रिका सबमिट झाल्या नाही. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुन्हा संदेश पाठवून पेपर घेतला.