जागतिक मुळनिवासी दिनानिमित्त पोंभुर्णा तालुक्यात विविध कार्यक्रम व आढावा बैठक
पोंभुर्णा-
(जयदेव मडावी)
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा-केमारा जि.प.क्षेत्रातील केमारा ग्रामपंचायत मधील सामाजिक सभागृहात संयुक्त कार्यक्रम व महागोंगोचे आयोजन करण्यात आले.गावातील गरजु लाभार्थीपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे काम करावे.प्रत्येकाने राजकारणात येऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करावी. सामाजिक संघटना समोर नेण्यासाठी सर्वानी मिळुन कार्य करावे.
2021च्या जनगणणेनुसार जनगणना ही जातिनिहाय होण्यासाठी एकजुटीने कार्य करावे.असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टी चे तालुका अध्यक्ष-जगनाथ येलके यांनी केले. यावेळी मंचावर उपस्थित गो.ग.पा.सचिव श्रीहरी सिडाम,
बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष-जयदेव मडावी केमारा ग्रा.पं सरपंच-सचिन पोतराजे,उपसरपंच-नवनाथ आत्राम चेकआष्टा ग्रा.पंं.सरपंच-कांताबाई मडावी घनोटी नं.2 ग्रा.पं सरपंच-योगिता संदीप ठाकरे कसरगट्टा ग्रा.पं.सरपंच-वर्षा पिपरे उपसरपंच-तिरुपती कुंभरे थेरगांव ग्रा.पं.सरपंच-संगिता गणवीर उपसरपंच-वेदनाथ तोरे मोहाळा ग्रा.पं सरपंच-दर्शना जुमनाके सातारा भोसले ग्रा.पं सरपंच-शालिनी सिडाम उपसरपंच-प्रविण पेन्दोर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गेडाम,दर्शन शेडमाके तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.