औसा :- मारुती शिंदे औसा तालुक्यातील भादा परिसरातील सोयाबीन पिकांनी माना टाकल्या असून पावसाळा सुरू होऊन दोन महिने उल टून गेले असले तरी अद्यापि या परिसरात मोठा पाऊस झाला नाही यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला या परिसरातील भादा ,बोरगाव,ऊटी काळमाथा ,लखनगाव ,समदर्गा, कोरंगळा ,भेटा व इतर गावात पेरण्या झाल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या मात्र यावर्षी सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल आणि आपले आर्थिक उन्नती होईल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली ..
भादा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकाची खुरपणी कोळपणी फवारणी शेतकऱ्यांना उसनवारी चे पैसे घेऊन केले गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून कोरडवाहू शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित या पिकावर आहे तेच पिक माना टाकत असलेली चिन्ह या परिसरात दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी उदास व हताश झाल्याचे दैनिक सामना शी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी आपले मन मोकळे केले.
भादा परिसर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा परिसर असून या परिसरात तावरजा मध्यम प्रकल्प जरी तारणहार असला तरी यावर्षी जेमतेम पाऊस झाल्याने तावर्जा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्पच आहे त्यामुळे या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील ऊस पिकासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी काटे वरची कसरत करायची ची वेळ आली आहे या परिसरातील अद्यापि ही मोठा पाऊस न झाल्याने नदी नाले ओढे बोरवेल्स कोरडे आहेत त्यामुळे भादा परिसरात येत्या चार ते पाच दिवसात नाही पाऊस पडल्यावर सोयाबीन पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही असे चिन्ह आपणास या परिसरात पहावयास मिळत आहे..
परिसरातील अनेक शेतकरी सोयाबीन पिकांना तुषार सिंचन ना मार्फत पाणी देत आहेत मात्र पाणीही मुबलक नसल्यामुळे तेही पाणी पिकांना अपुरे पडत आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकरी हतबल व उदास झाला असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे..