तळोधी(बा) येथिल अप्पर तहसिल कार्यालयात अतिरिक्त तहसिलदार तत्काळ देण्यात यावा : अश्विन मेश्राम
अमोल राऊत
नागभिड तालुक्यातुन अप्पर तहसिल कार्यालय म्हणुन तळोधी ( बा ) येथे मोठा गाजावाजा करुन स्थापण्यात आले होते. अतिरिक्त तहसीलदार म्हणुन राजपूत यांची नेमणुक झाली आणि अवघ्या ६ महीण्यात त्यांची बदली झाली. अप्पर तहसिल कार्यालय झाल्यामुळे जवळपास ४० गावाचा कारभार सोपवण्यात आला. मात्र कमी दिवसातच ४० गावांना नागभिड तहसील कार्यालया मधुनच सर्व कामे करावी लागत आहे.
अप्पर तहसिल झाल्यामुळे परीसरातील लोंकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले पण काही दिवसातच त्यावर विरजन पडले. तळोधी परिसरातील विद्यार्थी , सामान्य मानसाचे जात प्रमानपत्र ,अधिवास प्रमानपत्र , उत्पनाचे दाखले, इतर काही दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व सामान्य जनतेची गैरसोय होत आहे.
शासनाने व प्रशासनाने त्या ठिकानी नविन तहसिलदाराची नियुक्ति करने गरजेचे होते परंतु लोकप्रतीनिधी व प्रशासन यांनी कोणतेही दखल घेतलेली नसल्याने अप्पर तहसिल कार्यालय वा-यावर आहे.
अप्पर तहसिल कार्यालय अंर्तगत येणा-या ४० गावाचा डोलारा सध्या नागभिड तहसीलवर अवलंबुन आहे त्यामुळे लांब च्या गावावरून नागभिड तहसिल गाठण्यास अनेक अडचनीचा सामना करावा लागत असुन तळोधी ( बा ) येथील अप्पर तहसिल कार्यालय फक्त नाममात्र राहीले आहे. करीता विद्यार्थी व जनसामान्याची गैर सोय होऊ नये व जनसामान्य लोकांना होणारा त्रास दुर करण्याकरीता तळोधी ( बा ) येथे अप्पर तहसिल कार्यालयात अतिरिक्त तहसीलदार तात्काळ देण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाड़ी चे वतिने निवेदन देवुन आंदोलन करण्यात येईल अशी मांगणी तालुका अध्यक्ष अश्विन मेश्राम यांनी केली.