विज बिल माफ करा : विज बिलाची होळी ….. वंचित बहुजन आघाड़ी व विदर्भ राज्य आंदोलन समिती
वंचित बहुजन आघाड़ी व विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विज बिलाची होळी महावितरण कार्यालया सामोर करण्यात आली
लाँकडाउनच्या काळात मजुर, शेतकरी, आणि सर्व सामान्याच्या हाताला काम नसल्याने रोजगार मिळाला नाही त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊन उपजिवीका पुर्ण कशी करावी असा सर्वसामान्य लोंकाना प्रश्न पडलेला आहे
लाँकडाउनमुळे शेतक-यांची आर्थिक स्थिति बिकट असतांना 24/3/2020 पासुनचे लाँकडाऊन काळातील मागील तीन महीण्याचे जुन महीण्याच्या अखेरीस विद्युत बिल भरणाचे बिल वाटप करण्यात आले जे सर्वसाधारण लोंकाना आलेले भरमसाठ बिल भरणे कठीन झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य, मजुर लोकांनी उपजिवीका व शेतक-यांनी शेती करावी की विज बिल भरणा करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे सर्वसामान्याची आर्थिक अडचण सरकारने लक्षात घेऊन तिन महीण्याचे संपुर्ण विजबिल माफ करण्यात यावे यापुढे 200 युनिट पर्यत चे विज मोफत देण्यात यावे शेतक-यांची आर्थिक अडचनीचा सामना करीत असल्यामुळे शेतीपंपाचे थकीत बिल माफ करण्यात यावे इत्यादी मांगण्याकरीता वंचित बहुजन आघाड़ी व विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विज बिलाची होळी करून उपकार्यकारी अभियंता मार्फंत (म .रा) उर्जामंत्री मा नितीन राऊत यांना देण्यात आले
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनरावजी चटप वंचित बहुजन आघाड़ी चे विदर्भ प्रमुख डाँ रमेशकुमार गजभे वचिंत आघाडी चे तालुका अध्यक्ष अश्विन मेश्राम, महिला अध्यक्ष सौ कल्पना खरात, राजकुमार मेश्राम, खेमराज गेडाम, परशुराम नन्नावरे, विलास श्रिरामे, विनायक चिलबुले,अशोक रामटेके, जितेंद्र चौधरी, रामकृष्ण श्रिरामे, शाहरुख शेख, वैभव चौके, मानिक दोहीतरे, ईत्यादी उपस्थित होते