पशुवैद्यक पशुसंवर्धन पदविका धारकांना न्याय देण्याबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
पशुवैद्यक पशुसंवर्धन पदविका धारकांनी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांची भेट घेऊन दिले निवेदन
हिंगणघाट : तालुका प्रतिनिधी (अनंता वायसे) खासगी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद द्वारा नोंदणी क्रमांक मिळण्याबाबत पदविका धारकांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट घेउन त्यांच्या समस्या बाबत चर्चा केली तसेच निवेदन देण्यात आले.
दिनांक १५ जून २०२१ पासून खाजगी व शासकीय पशुधन पद्विका धारकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पशुधन पदविकाधारक तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना दिलेल्या निवेदनाची त्यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना समस्त मागण्यांचा लवकरात लवकर निकाल लावण्याबाबत पत्र देण्यात आले.
खाजगी पशुवैद्य पशुसंवर्धन पदविकाधारक जिल्हा शाखा वर्धा यांचे दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ रोजी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची भेट घेतली असता त्यांच्या निवेदनानुसार खाजगी पदविकाधारक यांच्याकरिता शेती व शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी शिफारस केलेली नॅशनल लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट कौन्सिलची स्थापना करून पदविकाधारकांना दुरुस्ती करण्यात यावी. महाराष्ट्रात भारतीय पशुवैद्यकीय परिषद १९८४ कायद्यात पदवीधारकका करिता दुरुस्ती करण्यात महाराष्ट्र राज्यातील पशुधन लक्षात घेऊन केंद्र सरकारला प्रवृत्त करावे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सण २००९ च्या अधिसूचनेतील २२ मायनर व्हेटर्नरी सर्विस नोंदणीकृत पशुवैद्यकांच्या मार्गदर्शन व देखरेख करण्याची अट शेतीतील किंवा रद्द करण्यात यावी अशा सर्व मागण्या करण्यात आल्या.
मागण्या दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. तरी आपण व्यक्तिशः लक्ष घालून संघटनेच्या मागण्या संदर्भात त्वरित सकारात्मक कारवाई होण्यासाठी संबंधित विभागास आदेशित करावे. पशुसंवर्धन पदविका धारकांच्या मागणी लक्षात घेता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांना पत्र देण्यात आले.