शहरात डेंगूचा कहर !
नगर परिषदेचा आरोग्य विभाग झोपेत!
कोरपना. प्रतिनिधी-प्रविण मेश्राम
सध्या पावसाळा सुरू असल्याने तालुक्यात विविध प्रकारच्या व साथीच्या आजाराने नुसते थैमान घातले असून सर्वे रुग्णालयामध्ये गर्दी झाली असून वर कोरोना महामारीचे संकट आहे पण सध्या तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत असुन नांदाफाटा येथे एक नव महिन्याच बाळ आणि एक युवक असे दोन रुग्ण डेंग्युमुळे दगावलेआहे.
तालुक्यातील औद्यागिक शहर म्हाणून नावारूपास आलेल्या गडचांदुर शहरात सुध्दा डेंग्युने थैमान घातले असून नगर परिषदेचे आरोग्य विभाग ना कोणत्याहि प्रकारची जंतु नाशक फवारणी करताना दिसत नाही त्यामुळे नगर परिषदेचा आरोग्य विभाग झोपेत तर नाही ना असे सध्या तरी दिसत आहे त्यामुळे आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे होवू संपुर्ण शहरात जंतुनाशाक फवारणी करुन आता तरी कुभकरणी झोपेतून जागे होऊन जनतेचे आरोग्याविषयीची थोडीफार काळजी घ्यावी. असी जनतेची रास्त मागणी आहे.